Skip to content
यशवंत शेरे यास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक
गुरूदेव परिवारातर्फे सत्कार संपन्न

————————————–
(अंबाजोगाई )
बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी यशवंत नामदेव शेरे यांने राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाइन अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केल्या असून लेवल वन बी त्याने यशस्वीरित्या पार केलेली आहे. अबॅकसचे त्याचे प्रशिक्षक महेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतने जी चॅम्प म्हणून राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवून गुरुदेव विद्यालयाचे व सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंदाचे नाव रोशन केले आहे. जेनियन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने लातूर येथे नॅशनल लेवल ऑफलाइन अबॅकस कॉम्पिटिशन 2024 संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये यशवंत नामदेव शेरे याने राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त केल्यामुळे गुरुदेव परिवाराच्या वतीने त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. यशवंतच्या या यशाबद्दल बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे सचिव डॉ.नरेंद्र काळे सर्व संचालक, मुख्याध्यापिका सौ.शशिकला काकडे, यशवंतचे वडील नामदेव शेरे, श्री सूर्यकांत तेलंग श्री विजय भिसे, श्री पंडित चव्हाण, श्री बाळासाहेब शिंदे, श्री प्रकाश बोरगावकर, सौ शितल काळदाते, सौ संगीता मोरे, सौ सोनाली कोनाळे, सौ ज्योती काळे यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 186
error: Content is protected !!