ताज्या घडामोडी

*सुशिक्षित बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी संत काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ असल्याने अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा* *—-दत्तात्रय क्षीरसागर यांचे आवाहन*

सुशिक्षित बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी संत काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ असल्याने अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा

—दत्तात्रय क्षीरसागर यांचे आवाहन

 

बीड (प्रतिनिधी)
सुशिक्षित बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी संत काशीबा महाराज आर्थिक विकास महामंडळ असून या साठी स्वतंत्र कोठा बँकेत राखीव आहे त्यामुळे अधिकाधिक युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., या महामंडळाची उपकंपनी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बीड व राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे गुरव समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाकडून राबवित असलेल्या विविध योजनेचा जिल्हा मेळावा बीड येथे शासकीय विश्रामगृह नगर रोड बीड या ठिकाणी
आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दत्तात्रय क्षीरसागर हे बोलत होते.


या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी महामंडळाचे लेखापाल श्री. बी. एस. भोसले व बाह्यसेवा कर्मचारी श्री. के. आर. कळसाने, श्री.एस.पी. शेंडगे, राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पुजारी, बीड जिल्हाध्यक्ष राजेश (नंदू )गवळी, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर, कृष्णा पुजारी, शिलाताई फडणीस, रामदास काळे, एकदरा येथील सरपंच प्रताप पाटील, हरिभाऊ नीलकंठ यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
या वेळी बोलताना बी के भोसले साहेब म्हणाले की संत काशीबा महाराज आर्थिक विकास महामंडळा साठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध केलेला असुन इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेले श्री संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या महामंडळामार्फत विविध योजना गुरव समाजासाठी सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे महामंडळ कटिबध्द आहे. ज्या गरजूना मंडळाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्या फाईल आमच्या कार्यालया मार्फत 12 तासाच्या आत मंजूर करून बँके कडे पाठवण्यात येतील. जर करता आपल्यास 1 लाख पर्यंत कर्ज हवे असेल त्यांच्या साठी ज्या अटी व शर्थी आहेत त्या जटील असून त्या शिथिल करण्या साठी आम्ही पाठपुरावा करत असून ज्यांना 10 लाख रुपया पर्यंत प्रस्ताव करावयाचे आहेत त्या प्रस्तावा साठी बँकेने हमी घ्यायला हवी जरी करता फाईल मध्ये अडचण येत असेल तर आपणास जिल्हाधिकारी किंवा लीड बँकेच्या मॅनेजर कडे तक्रार करता येते. गरजूंना आपले प्रस्ताव राष्ट्रीय बँके सोबत खाजगी बँक मार्फत ही करता येतील.
या वेळी बोलताना जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक दत्तात्रय क्षीरसागर म्हणाले की, युवकांना उद्योग करण्यासाठी प्रचंड ईच्छा शक्ती असावी लागते. कर्ज घेण्यासाठी आपण थकबाकीदार नसायला हवे, प्रत्येक योजनांचे बँकेला टार्गेट दिलेले आसते. उदयोग निवडताना चांगला असावा, लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हा शासनाचा उद्देश असून सुशिक्षित बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी संत काशीबा महाराज आर्थिक विकास महामंडळ असून या साठी स्वतंत्र कोठा बँकेत राखीव आहे. या मध्ये सर्वात महत्वाची अडचण ही बँकेची असते मात्र आपले व्यवहार सुरळीत असतील तर बँका आपल्या मागे कर्ज घेण्यासाठी स्वतःहून लागतात. आपल्याला जो उद्योग करावयाचा आहे त्या उद्योगाची माहिती आपल्यास नसेल तर आम्ही जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत आम्ही प्रशिक्षण देत असतो.


या वेळी दत्तात्रय अंबेकर, कृष्णा पुजारी, संदीप भालेराव, प्रताप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पुजारी यांनी केले तर, आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष राजेश (नंदु )गवळी तर सूत्र संचलन रंगनाथ मोकाशी सर यांनी केले.
या प्रसंगी महादेव पुजारी, श्रीपाद डांगे, लक्ष्मण पुजारी (अंबाजोगाई), राम शिर्के (आष्टी) संतोष गुरव, बंडू रायते (तलवडा), संजय गुरव, प्रदीप गवळी,उमेश पुजारी, अविनाश पुजारी,
, सोमनाथ वाघमारे (गेवराई), वैभव मोकाशे (शिरूर) दत्ता काळे (अंजनवती ) बडुभाऊ पुजारी (गऺगामसला) रंगनाथ क्षीरसागर (शिरुर), राजु गुरव (आष्टी) शंकर पुजारी (धारूर) विष्णु मोकाशी, गणेश मोकाशी (केज) राजु गवळी, गणेश वाघमारे, रामदास काळे, मनोहर काळे, गोपाळ पुजारी, भाऊसाहेब मोकाशी (उत्तरेश्वर पिंपरी), दत्ता शिवणीकर, जितेंद्र पुजारी माजलगांव, बबलू शिंदे चौसाळा, राम क्षीरसागर, राजू वाघमारे, मयूर गवळी, राजू गवळी, दत्ता नीलकंठ, दत्ता भालेराव, सचिन वाघमारे ,संतोष गुरव (माजलगाव), आकाश पुजारी (परळी)
यांच्या सह जिल्हा भरातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!