ताज्या घडामोडी

संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी द्या ही मागणी घेऊन विविध राजकीय पक्ष, संघटना व जाती धर्माचे जोडे बाहेर ठेऊन बीड मध्ये निघाला लाखोंचा आक्रोश मोर्चा

संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी द्या ही मागणी घेऊन विविध राजकीय पक्ष, संघटना व जाती धर्माचे जोडे बाहेर ठेऊन बीड मध्ये निघाला लाखोंचा आक्रोश मोर्चा

 

बीड (प्रतिनिधी)
   सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये मधील प्रमुख सूत्र धाराला फाशी होई पर्यंत लढा चालूच राहील असा इशारा देत बीड शहरात निघालेल्या भव्य आक्रोश मोर्चात राज्याच्या काना कोपऱ्यातुन आलेल्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी सह विविध जाती धर्माचे लाखो लोक सामील झाले होते.
    या मोर्चात मनोज जरांगे, राजे छत्रपती संभाजी महाराज, खा बजरंग भोसले, आ जितेंद्र आव्हाड, आ अभिमन्यू पवार, आ सुरेश धस, आ प्रकाश दादा सोळंके, आ विजय सिंह पंडित, आ संदीप क्षीरसागर, आ नरेंद्र पाटील, माजी आ संगीता ठोंबरे, मा आ पृथ्वीराज साठे, रमेशराव आडसकर, सुरेश नवले, सय्यद सलीम, ज्योती ताई मेटे, नंदकिशोर मुंदडा, शेख महेबूब भाई, मोहन जगताप, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, अनिल जगताप, राजेंद्र मस्के, दीपक केदार, रमेश पोकळे, सक्षणा सलगर, पूजा मोरे  यांच्या शेकडो नेते, संतोष देशमुख यांचे कुटुंब व विविध राजकीय पक्ष, व जाती धर्माचे जोडे बाहेर ठेऊन लाखोंचा जनसमुदाय सामील झाला होता.
    या वेळी सर्व मान्यवरांनी हा आक्रोश संपूर्ण राज्यात आहे याची जाणीव करून देत हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षांचा, कुठल्या जाती पातीचा नसून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी व बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आहे हे शासनाला दाखवून दिले. या वेळी मोर्चेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या उर्वरित आरोपीस तात्काळ अटक करा, या घटनेचा मुख्य सूत्रधार जो कोणी असेल त्याला अटक करा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात व अंडर ट्रायल चालवावा आदी सह केस चा तपास पूर्ण होई पर्यंत ना धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे ही प्रमुख मागणी लावून धरली.
      या वेळी उपस्थित सर्व वक्त्यांनी ना धनंजय मुंडे यांचे विश्वासु वाल्मिक कराड यांच्या वर निशाणा साधत बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला खंडणीच्या माध्यमातून ही कडी संतोष देशमुख यांच्या हत्ये पर्यंत कशी येते हे निदर्शनास आणून देत त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!