संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या ?– अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ
संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या ?– अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २० दिवस उलटले, पण अजूनही अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. या हत्येच्या निषेधार्थ आज थोड्याच वेळात बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मार्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आहे. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा दावा केला आसून गेल्या काही दिवसापासून अंजली दमानिया यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन बीडमधील गुन्हेगारीचे पुरावे देत आहेत. बीड जिल्ह्यात उघड-उघड हत्यार वापरत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सरपंच देशमुख यांच्या आरोपींवर कारवाई करण्याची व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, आज त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आसून अंजली दमानिया म्हणाल्या, “काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान मला एक फोन आला. त्यांनी मला व्हॉट्स अप वर कॉल घेण्यास सांगितले. मी व्हॉट्स अप कॉल केला तर तो झाला नाही. त्यांनी मला व्हाईस मेसेज पाठवले. यात त्यांनी सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपी मिळणारच नाहीत, कारण त्यांचे मर्डर झाले आहेत. हे व्हाईस मेसेज किती खरे किती खोटे याची पडताळणी करण्या साठी ही सर्व माहिती दमानिया यांनी बीड जिल्हा पोलीस आधीक्षक यांना दिली आहे.
