ताज्या घडामोडी

संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच धाराशिव मधील सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच धाराशिव मधील सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

धाराशिव(प्रतिनिधी)

   सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झालेला असतानाच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशी घटना धाराशिव मधील तुळजापूर तालुक्यात घडली आसून मसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांना गाडीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असून या हल्ल्यात ते थोडक्यात बचावल्याची घटना काल मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.

   तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते. गाडीत त्यांचा भाऊ देखील होता. तेव्हा मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये नामदेव निकम थोडक्यात बचावले. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नामदेव निकम बारुळ गावातून मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते. त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या. बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असं समजून नामदेव यांनी गाडीचा वेग कमी केला. लगेच त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले. ‘आम्ही गाडीचा वेग वाढवला. तेव्हा बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला. त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला’, असा घटनाक्रम नामदेव यांनी सांगितला. तसेच पवनचक्कीच्या वादावरुन हा हल्ला झाल्याचा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले.

    दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झालेला असतानाच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशा सरपंच नामदेव निकम यांच्या वरील हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!