अंबाजोगाई शहरात युवकावर प्राणघातक हल्ला, स्वा रा ती रुग्णालयात दाखल
अंबाजोगाई शहरात युवकावर प्राणघातक हल्ला, स्वा रा ती रुग्णालयात दाखल, शहरात खळबळ
अंबाजोगाई(प्रतिनिधी)
तु मला शिवीगाळ का केलीस या किरकोळ कारणा हुन येथील सदर बाजार परिसरात राहणाऱ्या शेख जमीर यास श्रीहरी दौलत मुंडे सह अन्य तीन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री येथील स्वा रा ती रुग्णालय परिसरात घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, दिनांक 25/12/2024 रोजी रात्री 9.30 वाजता सदर बाजार परिसरातील रहिवासी शेख जमीर हा दवाखान्यावर असतांना श्रीधर दौलत मुंडे रा क्रांती नगर, अंबाजोगाई याने जमीर यास दारु पी असे म्हणल्या नंतर त्याने त्यास विरोध केला व जमीरने त्यास शिवीगाळ केली याचाच राग मनात धरून लागलीच रात्री साडे बारा वाजता शेख जमीर हा सरकारी दवाखान्याचे कमानी समोर चौकात बसलेला असताना श्रीधर मुंडे यांने त्यास आवाज देऊन स्वा रा ती मधील कमानी जवळच्या एटीएम समोर बोलविले तो त्या ठिकाणी गेला असता श्रीहरी दौलत मुंडे यांने तु मला शिवीगाळ का केलीस असे म्हणुन चाकुने मानेवर मारहान केली. व त्यांच वेळी पाठीमागुन तीन लोकांनी चाकुने, कोयत्याने मारहान केली. मी पाठीमागे वळुन पाहीले असता त्यात एक आर्यन मांदळे व इतर अनोळखी दोन इसम होते. शेख जमीर यास चक्कर आल्याने तो खाली पडला नंतर त्याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात नेऊन उपचारार्थ दाखल केले.
दरम्यान या प्रकरणी शेख जमीर याचा भाऊ शेख मतीन याचे फिर्यादी वरून आरोपी श्रीहरी दौलत मुंडे, आर्यन मांदळे व इतर दोन इसमा विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109, 3(5) नुसार अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आसून स्वा रा ती रुग्णालयातील पोलीस चौकी परिसरात ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
