*अंबाजोगाईत मनुस्मृती दहन करून केला विषमतावादी व्यवस्थेचा निषेध*
*अंबाजोगाईत मनुस्मृती दहन करून केला विषमतावादी व्यवस्थेचा निषेध*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाईत बुधवारी मनुस्मृती दहन करून विषमतावादी व्यवस्था नाकारत शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भारतीय संविधान प्रेमी नागरिकांकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी संविधान प्रेमी नागरिकांकडून बुधवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर सहभागी आंदोलकांनी मनुस्मृती दहन केले. यावेळी कॉ.बब्रुवाहन पोटभरे, भीमराव सरवदे, आर.जी.मस्के, अशोक पालके, राजेश वाहुळे, धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, हमीद चौधरी यांनी उपस्थित संविधान प्रेमी नागरिकांना संबोधित केले. उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन करून येथील विषमतावादी व्यवस्था नाकारली, स्त्रियांना गुलामगिरीतुन मुक्त केले. परंतु, आजही या देशामध्ये संविधान लागु असतांना सुध्दा येथे मनुचा विचार जपला जातो. राजस्थान मध्ये जाहिररित्या मनुचे मंदीर बांधले जाते, रोज स्त्रियांना गुलाम बनविणारे विचार जाहिररित्या पेरले जातात, सनातनी कॉर्पोरेट सत्ता भारतात आणि महाराष्ट्र राज्यात आल्यापासून दलीत, अदिवासी, अल्पसंख्याक यांना लक्ष करून पोलीसांमार्फत यांची दडपशाही केली जातेय. मनुची विषमतावादी व्यवस्था टिकविण्यासाठी शासन व प्रशासन काम करीत आहे. या विषमतावादी व्यवस्थेचा आम्ही जाहिर निषेध करून त्या मनुची मनुस्मृती नाकारत आहोत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर निवेदक कॉ.बब्रुवाहन पोटभरे, भिमराव सरवदे, आर.जी.मस्के, अशोक पालके, धीमंत राष्ट्रपाल, विनोद शिंदे, हमिद चौधरी, राजेश वाहुळे, अनिल ओव्हाळ, अशोक ढवारे, अविनाश कुऱ्हाडे, रवि आवाडे, मुक्ता वायदंडे, बादल तरकसे, प्रेम माने, वैजनाथ वाघमारे, मनिष आदमाने, संघपाल तरकसे, गुलनाज शेख, अमोल सरवदे, अजय गोरे, बाबा शेख, प्रदीप वारकरी, राकेश काळे, सुशिल गायकवाड, दिलीप गोरे, राम काटे, हनुमंत गायकवाड, विद्या गायकवाड, मंजुषा कसबे, आरोही कसबे, छाया कसबे, लक्ष्मी कसबे, सुनंदा जोगदंड, विद्या गावडे, उषा गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रसंगी विशाल पोटभरे, अमर वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
*‘ग्रंथाची विक्री थांबवून फौजदारी कारवाई करा’ :*
मूळ संस्कृत भाषेत असलेल्या या ग्रंथाचे संपूर्ण मराठीत भाषांतर करण्यात आले असून राज्यभरातील पुस्तकालयांमधून विक्रीही होत आहे. दलित, पीडित आणि शोषितांना, विशेषत: महिलांना गुलाम बनविण्याचे धडे देणाऱ्या या ग्रंथाविरूद्ध पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर जनमानस पेटून उठून २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. पुढे पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याने काही वर्षांपूर्वी या ग्रंथाच्या प्रकाशन व विक्रीवर बंदी घातली होती. परंतु, बंदी आदेशाची अंमलबजावणीच करण्यात आली नव्हती. प्रत्यक्षरीत्या हा ग्रंथ नेमका कोणी आणि कोणत्या कालखंडात लिहिला याचा अद्यापही शास्त्रोक्त शोध लागलेला नाही. ब्रह्मदेवाचा पहिला सुपुत्र मनू याने हा ग्रंथ लिहिला असून प्राचीन हिंदू धर्मशास्त्रत त्याला मान्यता आहे. त्याला विधी ग्रंथही म्हटल्या जाते. इंग्रज राजवटीत सर विलियम जोन्स यांनी १७९४ मध्ये या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांनी या ग्रंथाचा भाग हिंदू कायद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या ग्रंथाचा संदर्भ देऊन विविध समाज बांधवांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहेत. तसेच या ग्रंथात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही असे नमूद केले आहे. या ग्रंथातून दलित, पीडित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि शोषितांना, विशेषत: महिलांना गुलाम बनविण्याचे धडे दिले जातात. त्यामुळे या ग्रंथाची विक्री थांबवून फौजदारी कारवाई करा. कारण, सनातनी कॉर्पोरेट सत्ता भारतात आणि महाराष्ट्र राज्यात आल्यापासून दलीत, अदिवासी, अल्पसंख्याक यांना लक्ष करून पोलीसांमार्फत यांची दडपशाही केली जातेय. मनुची विषमतावादी व्यवस्था टिकविण्यासाठी केंद्र व राज्यातील शासन व प्रशासन काम करीत आहे. या विषमतावादी व्यवस्थेचा आम्ही जाहिर निषेध करून त्या मनुची मनुस्मृती नाकारत आहोत.
– *कॉ.बब्रुवाहन पोटभरे*
– (निमंत्रक, जाती अंत संघर्ष समिती, बीड.)
=======================
=======================
