सरगम म्युझिकल ग्रुपने कोल्हापूरचे नांव सातासमुद्रापार नेले – महाराष्ट्र आयएमएचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले
सरगम म्युझिकल ग्रुपने कोल्हापूरचे नांव सातासमुद्रापार नेले – महाराष्ट्र आयएमएचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले
कोल्हापूरला रंगला अनोखा विश्वविक्रमी सोहळा
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे आयोजित विश्वविक्रमी संगीत सोहळ्यात महाराष्ट्रातून ९० गायक कलाकारांनी मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली १०० गीते गात संगीतकार मदन मोहन यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगितांजली अर्पण करीत सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची विश्वविक्रमी नोंद केली.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ‘सिफा’चे एडिटर इन चीफ प्रा.डॉ.दीपक राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबेजोगाईचे सुप्रसिध्द मानसोपार तज्ज्ञ तथा शिक्षण सभापती व महाराष्ट्र राज्य आयएमएचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांची विक्रममंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मदन मोहन यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी बोलतांना सिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ.दीपक रावत यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करीत या अनोख्या विश्वविक्रमाचा मला साक्षीदार होता आल याचा गर्व वाटतो आणि महाराष्ट्रात असा विश्वविक्रम झाला ही तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे सांगत हा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहील असे प्रतिपादन केले. डॉ.राजेश इंगोले यांनी कोल्हापूर हे पूर्वी मराठी चित्रपट सृष्टीचा आत्मा होता, जगदीश खेबुडकर आणि अशा अनेक महान विभूती येथे जन्माला आल्या ज्यांनी आपल्या अलौकिक कार्याद्वारे चित्रपट सृष्टीत अनेक विक्रमाची शिखर गाठली आणी हाच गौरवशाली परंपरेचा विक्रमी वारसा सरगम ग्रुपच्या डॉ.आशा शितोळे, डॉ.राजेंद्र तामगावकर समर्थ पणे पुढे चालवीत हा विक्रम केला असल्याबद्दल त्यांचं कौतुक करीत या संगीत ग्रुपने कोल्हापूरचे नांव सातासमुद्रापार नेत विश्वविक्रमी पुस्तकात कोरले ही तमाम कोल्हापूरकरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशासाठी गौरवाची गोष्ट असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी माझ्यासह अनेक कलाकार इतक्या दुरवरून कोल्हापूरला आले आहेत. याचे कारण केवळ संगीतावरील असलेले सर्वांचे प्रेम असल्याचे सांगत कोल्हापूर, सरगम ग्रुप आणि आम्ही सर्व कलाकार संगीत नावाच्या जादुई दुव्याने जोडले गेले असल्याने ही रेशीमगाठ आणी ऋणानुबंध कधीच सुटणार नाहीत अशी ग्वाही दिली. संगीत हे माणसांची मने जोडण्याचे काम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे असे गौरवोद्गार ही डॉ.राजेश इंगोले यांनी काढले. याप्रसंगी या संगीतमंचावर कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका डॉ.आशा शितोळे, राजेंद्र तामगावकर यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सिफा बुक ऑफ रेकॉर्ड (सोसायटी ऑफ इंटिग्रेटेड फेडरेशन ऑफ अवॉर्ड) यामध्ये नोंद करून या सांगीतिक सुमनांजलीची जागतिक विश्वविक्रम म्हणून नोंद घेण्यात आली. सरगम म्युझिकल ग्रुप (एसए) यांच्या वतीने संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यभरातील सुप्रसिध्द गायक कलाकार सहभागी झाले होते. हा विश्वविक्रमी कार्यक्रम सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असा तब्बल नऊ तास चालला यात नव्वद गायकांनी मदनमोहन यांची शंभर गाणी गात अनोखा विश्वविक्रम केला. यावेळी गायक कलाकारांना सीफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी यशवंत बँकेचे संचालक बाबुराव रानगे, डॉ.आशा शितोळे, डॉ राजेंद्र तामगावकर, डाॅ.अनिल कवठेकर, दिगंबर सूर्यवंशी, माया मनपाडळेकर, अनिता गवळी, के.टी.शिंदे, उत्तम पाटील, पुष्पक गवई, राजकुमार पारकर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरगम म्युझिकल ग्रुपचे सुभाष भाट यांच्या मार्गदर्शनात सर्व सभासद सदस्य आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.
=======================
=======================
