नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच पहिला दणका दिलाय तो परळीचे कैलास फड यांना
नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच पहिला दणका दिलाय तो परळीचे कैलास फड यांना
हवेत गोळीबार प्रकरणी पोलिसात गुन्हा
बीड (प्रतिनिधी)
नवनीत कॉवत यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच पहिला दणका परळी येथील कैलास फड यांना दिला आसून हवेत गोळीबार केल्या प्रकरणी कॉवत यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्हा सध्या राज्यभरातच नाही तर देशभरात चर्चेत आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान घातलं आहे. त्यातच या सर्व घटनांना जातीय आणि राजकीय रंग आहेत. त्यामुळे त्याची अधिकच चर्चा आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याने जिल्हा ढवळून निघाला आहे या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक आक्रोश सोबतच उसळला आहे.
नुकतच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे पार पडलं. त्यामध्येही हे प्रकरण गाजलं. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं असून या प्रकरणात कुणालाच सोडणार नाहीत असा थेट इशारा दिलाय. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोण नवा अधिकारी मिळणार अशी चर्चा होती. अखेर फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर
छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असलेले नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली. नवनीत कॉवत यांनी आदेश येताच 12 तासाच्या आत पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आणि तातडीने संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि लवादा कंपनीच्या वतीने दाखल खंडणी प्रकरण यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व त्या दृष्टीने हालचाली ही सुरू केल्या आहेत.
त्यांच्या समोर आता बीडला लागलेला गुन्हेगारीचा डाग मिटवण्याचे त्यांच्या समोर एक चॅलेंज आसल्याने त्यांनी
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसवण्या साठी पहिला दणका दिला आहे तो परळी शहरातच. परळी येथील कैलास फड ज्यांचा की विधानसभा मतदाना दिवशी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ऍड माधव जाधव यांना मारहाणीचा व्हिडीओ राज्यभरात गाजला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी हवेत गोळीबार केलेला व्हिडीओ सर्वत्र गाजल्या नंतर ही बीड च्या पोलीस यंत्रणेने कुठलीही कार्यवाही केला नव्हती मात्र हवेत गोळीबार केल्या प्रकरणी कॉवत यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसात कैलास फड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आ सुरेश धस व अंजली दमानिया यांनी उचलले रिव्हॉल्वर प्रकरण
बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि दिल्या गेलेले 1222 बंदुकीचे परवाने शिवाय विना परवाना असलेले घावटी कट्टे या मुद्द्याला धरून आ सुरेश धस यांनी विधानसभेत आवाज उठवल्या नंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मुद्याला हात घालत परवाना धारक बंदूक धाऱ्याचा इतिहास भूगोल काढण्यास सुरवात केली आहे.
