पोस्कोच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा खून करून मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून दिला
पोस्कोच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा खून करून मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून दिला
बीड :-
पोस्को मधील गुन्हेगार रणजीत गिरी या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिल्या नंतर तो नांदगाव शिवारामध्ये पाण्यामध्ये तरंगत वाहत जात असल्याचे निदर्शनास आले.
या विषयी प्राप्त माहिती आशी की, बीड येथील रहिवाशी रणजित सुनील गिरी (वय 23 ) हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र, मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांशी संपर्क केल्यावर दूरध्वनीवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. यामुळे नातेवाईकही तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे त्यांना वाटत होते. नांदगाव शिवारामध्ये कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये नागरिकांनी एक मृतदेह वाहत आल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह वर काढला. मृताचे नाव रणजित सुनील गिरी असल्याचे समजले. यानंतर त्याच्या नातेवाइकांना याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
मृतदेह कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदानासाठी आणण्यात आला होता. या वेळी त्याच्या गळ्याभोवती जखम झाल्याचे व फाशी दिल्यासारखा व्रण असल्याचे दिसून आले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सध्या बीडमधील अतिशय संवेदनशील वातावरणामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकही तेथे आले. त्यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.
पोलिस निरीक्षक मारुती मुळक यांनी अवघ्या काही वेळातच या सगळ्या घटनेचा व खुनाचे नेमके रहस्य काय आहे ते शोधून काढले. रणजित गिरी याचा खून झाला असून, त्याला रविवारी (दि. 22) रात्रीच कुकडी कालव्यामध्ये खून करणार्यांनी फेकून दिले. त्यांना वाटले की मृतदेह वाहून जाईल. मात्र, तसे घडले नाही आणि मृतदेह पाण्यामध्ये वाहताना अडकला.
रणजित सुनील गिरी हा देखील आरोपीच आसून त्याच्यावर मिरजगाव पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. जानेवारी महिन्यापासून तो कर्जत येथील पोलिस कोठडीतच होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतरही मृत रणजित गिरी हा याच परिसरामध्ये बीडला न जाता राहत होता आणि यानंतर ही घटना घडली आहे. याच कारणातून त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
