मध्यधुंद अवस्थे मधील डंपर चालकाने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं 3 जणांचा मृत्यू 6 जण गंभीर जखमी
मध्यधुंद अवस्थे मधील डंपर चालकाने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं 3 जणांचा मृत्यू 6 जण गंभीर जखमी
पुणे (प्रतिनिधी)
पुणे शहरात हिट अँड रन अपघातांच सत्र अद्यापही सुरूच आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका मध्यधुंद अवस्थे मधील डंपर चालकाने फूटपाथवर शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घृणपणे चिरडलं असून यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 1-1.30 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने झोपेत असलेल्या 9 जणांना चिरडलं. फूटपाथवर झोपलेले, जखमी असलेलेल हे सर्व अमरावतीचे रहिवासी असल्याचं समजतं. काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एका फूटपाथवर ते झोपले होते. मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यापैकी विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष), वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष ) या तिघांचा जागीच मृत्यू झाला, त्यांना रुग्णालयातही नेण्यात आलं नाही. जानकी दिनेश पवार (वय 21), रिनिशा विनोद पवार (वय 18), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (वय 18) आलिशा विनोद पवार (वय 47) अशी 6 जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी तिघांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे पुण्याच एकच खळबळ माजली असून तिघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
