संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत राष्ट्रवादीचे नेते मा खा शरदचंद्र पवार यांचा ईशारा
संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत
राष्ट्रवादीचे नेते मा खा शरदचंद्र पवार यांचा ईशारा
केज (प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत, आम्ही देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आमच्या कडे घेतो अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व देशाचे नेते मा खा शरदचंद्र पवार यांनी आज मस्साजोग येथे येऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्या नंतर दिली. या वेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अजूनही फरार आहे. तसंच पोलीस प्रशासन आणि राजकीय व्यक्तींकडून खतपाणी घालण्यात आल्यानेच आरोपींची हत्या करण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मस्साजोग इथे येऊन दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत मा आ राजेश टोपे खा निलेश लंके, खा बजरंग सोनवणे, आ संदीप क्षिरसागर, महेबूब शेख, मा आ पृथ्वीराज साठे, डॉ नरेंद्र काळे, राजेसाहेब देशमुख, कु. सक्षणा सलगर, ऍड उषाताई दराडे, संजीवनी देशमुख यांच्या सह असंख्य नेते उपस्थित होते.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांच्या आत्येभावाने दिलेल्या तक्रारीनंतरही पोलिसांनी तब्बल तीन तास गुन्हा नोंद केला नाही. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. हत्येची बातमी आल्यानंतर पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंद केला. राजकीय दबावामुळेच पोलिसांनी ही दिरंगाई केल्याचा आरोप देशमुख यांच्या नातेवाईकांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. आरोप करणाऱ्यांच्या रोख हा राष्ट्रवादीचे नेते
आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर असल्याचं पाहायला मिळतं असून संतोष देशमुख हत्ये नंतर आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांच्या विधान सभेतील सभागृहा मधील भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भाषणा मुळे सर्वच सदस्यांचे व ही भाषणे पाहून सर्वच दर्शकांचे डोळे पानावत होते. आरोपीस याच पध्दतीने शासन व्हावे अशी सर्वांची ईच्छा आहे.
काल विधान सभेत मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडत असताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. या ठिकाणी आराजकतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यास काही अंशी पोलीस प्रशासन ही दोषी आहे. येथील संघटित गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या होण्या पूर्वी खंडणीच्या विषया हुन जो राडा झाला यात वाल्मिक कराड यांचा रोल असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात जेजे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही होईल त्या साठी एस आय टी सोबत न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा ही या वेळी त्यांनी केली.
या वेळी त्यांनी देशमुख कुटुंबियाना 10 रु शासनाची मदत ही जाहिर करून घटने दिवशी केज चे पो नी महाजन यांनी आरोपी च्या शोधा साठी प्रयत्न केल्याचे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे आदेश दिले असून त्यांच्या जागी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज खा शरदचंद्र पवार यांनी मस्साजोग येथे येऊन स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी सर्व ग्रामस्थ भावनिक झाले होते. शरदचन्द्र पवार यांनी या वेळी देशमुख कुटुंबातील सदस्यांना मानसिक आधार देत आरोपीस कडक शासन होई पर्यंत आम्ही आपल्या सोबत आहोत हा विश्वास दिला या वेळी पवार यांनी या प्रकरणी जे सूत्रधार आहेत त्यांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत.
आम्ही देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेत आहोत अशी ग्वाही दिली आणि बीड जिल्ह्यात बिघडलेल्या परस्थिती वर चिंता व्यक्त केली.
