संतोष देशमुख हत्येचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुख हत्येचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांची सभागृहात भावनिक आणि अंगावर शहारे आणणारी भाषणे
बीड:- (प्रतिनिधी )
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांच्या सभागृहा मधील भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भाषणा मुळे सर्वच सदस्यांचे व ही भाषणे पाहून सर्वच दर्शकांचे डोळे पानावत असून आरोपीस याच पध्दतीने शासन व्हावे अशी सर्वांची ईच्छा आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर शवविच्छेदन अहवाल समोर आला आसून यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे.
आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा तपशील विधानसभेत मांडला होता.
संतोष देशमुखच्या पोस्टमार्टेमध्ये नेमकं काय म्हटलंय?
संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध ठिकाणी मुका मार दिल्याने अतिरक्तस्राव झाला आहे. त्यामुळे ते शॉकमध्ये गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिज’ असे नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या छाती, हात-पाय, चेहरा, डोके या भागात मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. त्यामुळे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचे डोळे जाळून टाकल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत कोणाकोणाला अटक?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतले होते. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सभागृह आणि संपूर्ण मानव जात हळहळतेयं
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांची सभागृहात भावनिक आणि अंगावर शहारे आणणारी भाषणे सुरू आहेत, सर्व जणच ही हत्या किती क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे, याचा मास्टर माईंड शोधा अशी मागणी करत आहेत या भाषणा मुळे सर्वच सदस्यांचे व ही भाषणे पाहून सर्वच मानवाचे डोळे पानावत असून आरोपीस याच पध्दतीने शासन व्हावे अशी ईच्छा सर्व स्तरातील लोक व्यक्त करत आहेत.