११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्या होणार उद्घाटन, नागरीकांना सहभागी होण्याचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचे आवाहन
११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्या होणार उद्घाटन, नागरीकांना सहभागी होण्याचे
स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून या संमेलनास शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अधिकाधिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे याचे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने प्रति दोन वर्षी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. लोकाश्रयावर आधारीत असलेले हे ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन यावर्षी १४ व १५ डिसेंबर रोजी येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलना पुर्वी शहरात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार,
मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे आणि
स्वागत समितीच्या सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने साहित्य संमेलनापुर्वी शहरात साहित्यिक उपक्रम राबविण्यात यावेत व साहित्य चळवळ अधिक गतीमान व्हावी यासाठी शहरात कथा लेखन कार्यशाळा, गझल लेखन कार्यशाळा, शिक्षक कवी संमेलन, व्यक्ती चित्रण लेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासर्व उपक्रमास शहरातील साहित्य प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.
यासर्व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आता १४ व १५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या सायंकाळी ४ वाजता नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.
तत्पूर्वी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ज्येष्ठांचा सन्मानासाठी जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी , वाद्यवृंद पथक, स्वागत समितीचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरीकांचा सहभाग असणार आहे. या जागर दिंडीची सुरुवात माजी स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. आय खडकभावी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही ज
ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संमेलन स्थळी येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता या दोन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार हे राहतील. डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसाप अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गैरख शेंद्रे व स्वागत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील.
या उद्दघाटनीय कार्यक्रमानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन, खुले कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजता नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण” या विषयावरील परीसंवादात, दुपारी १२ ते १ चहलपहल , दुपारी १ ते ३ संमेलन अध्यक्ष बालाजी सुतार यांच्या साहित्यावर परीसंवाद, ३ ते ४ कथाकथन तर ४ वाजता समारोपीय सत्र सुरू होणार आहे.
या समारोपीय सत्रास प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसाप अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे यांच्या सह सर्व स्वागत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या सर्व उपक्रमात सहभागी झालेल्यांची प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. तसेच संमेलन पुर्व उपक्रमांर्तगत सर्व संयोजकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सोबतच स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचा मसापच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या समारोपीय कार्यक्रमात हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या हातांचा ही सत्कार करण्यात येणार आहे.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, सचीव प्रा. पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे व स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
