संविधानाची विटंबना केल्या प्रकरणी डॉ आंबेडकर अनुयायांच्या वतीने आयोजित परभणी बंदला हिंसक वळण
संविधानाची विटंबना केल्या प्रकरणी डॉ आंबेडकर अनुयायांच्या वतीने आयोजित परभणी बंदला हिंसक वळण

जाळपोळ, दगडफेक केल्या नंतर पोलिसांचा लाठीचार्ज अश्रूधुराचा वापर
परभणी :-(प्रतिनिधी)
संविधानाची विटंबना केल्या प्रकरणी डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या वतीने आयोजित परभणी बंदला हिंसक वळण लागले असून अनियायांनी जाळपोळ, दगडफेक केल्या नंतर पोलिसांनी लाठीचार्ज अश्रूधुराचा वापर करून जमाव पांगवण्यास सुरुवात केली आहे.
काल परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाज कंटकांनी विटंबना केल्या नंतर या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे कालच रास्ता रोको, रेल रोको व किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले होते. आज पुन्हा परभणी बंदची हाक देण्यात आली होती. शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या प्रसंगी रस्त्यावर उतरलेल्या महिला व पुरुष अनुयायांनी दुकानावर दगडफेक व जाळपोळ सुरू केली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव एवढा संतप्त होता की, जमावाने पोलिसांवर ही दगडफेक सुरू केली त्यामुळे पोलिसांनी ही सर्व प्रथम लाठीचार्ज आणि त्या नंतर अश्रूधुरांचा वापर करून जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केला. या घटने मध्ये काही महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.
