संतोष देशमुख यांची हत्या व अमोल डूबे अपहरणाची सी आय डी चौकशी करून आरोपींची पाने मुळे शोधण्याची खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी
संतोष देशमुख यांची हत्या व अमोल डूबे अपहरणाची सी आय डी चौकशी करून आरोपींची पाने मुळे शोधण्याची खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी
दिल्ली(प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अमोल डूबे अपहरणाची सी आय डी चौकशी करून आरोपींची पाने मुळे शोधा अशी मागणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना खा बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या या गंभीर प्रकारा बद्दल अत्यन्त संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. पवनचक्की च्या कंपनी वाल्या कडून हप्ता मागणाऱ्या लोका कडून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली जाते, हत्ये पूर्वी काही तास केजचा पोलीस अधिकारी त्या हल्लेखोरा सोबत असतो आणि लागलीच हत्या होते, त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आज संपूर्ण केज तालुका रस्त्यावर आहे नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. एकूणच बिहारलाही लाजवतील आशा घटना या जिल्ह्यात सुरू आहेत.
परळी मध्ये एका तरुण व्यापाऱ्याचे आहरण करून खंडणी वसूल केली जाते या घटना बीड जिल्ह्याला न शोभणाऱ्या असून जे कोणी याच्या मागे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अमोल डूबे अपहरणाची सी आय डी चौकशी करून आरोपींची पाने मुळे शोधावी अशी मागणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रसंगी केली आहे.
Post Views: 246