सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा घटनेला 12 तास ही लोटत नाहीत तोच परळीचे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे यांचे 2 कोटी रुपयांच्या खंडणी साठी अपहरण
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा घटनेला 12 तास ही लोटत नाहीत तोच परळीचे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे यांचे 2 कोटी रुपयांच्या खंडणी साठी अपहरण
काही रक्कम पोच केल्या नंतर सुटका शहरात खळबळ
परळी:- (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा घटनेला 12 तास ही लोटत नाहीत तोच परळीचे माजी नगराध्यक्ष विकास डुबे यांचे चिरंजीव व नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे यांचे 2 कोटी रुपयांच्या खंडणी साठी अपहरण झाल्याची घटना काल रात्री परळी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घडल्या नंतर काही रक्कम पोच केल्या नंतर सुटका केली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की,
परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक विकास डुबे यांचे चिरंजीव व परळीच्या औद्योगिक वसाहती मध्ये बॅटरीचा व्यवसाय करणारे नामांकित व्यापारी अमोल विकास डुबे हे काल रात्री आपला व्यवसाय बंद करून घरा कडे निघालेले असता या परिसरात स्विफ्ट कार मध्ये दबा धरून बसलेल्या काही अज्ञात आरोपीने अमोल डूबे यास गाठून मारहाण केली आणि स्विफ्ट कार मध्ये घालून अंबाजोगाईच्या दिशेने घाटात नेऊन अमोल ला घरी कॉल करायला लावला व आरोपीने 2 कोटी रुपयांची मागणी केली.
यावेळी त्यांच्या घरच्यांनी काही रक्कम पोच केल्या नंतर अमोलची सुटका करण्यात आली.
दरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या घटनेस 12 तासही लोटत नाहीत तोच अमोल डुबे यांचे परळी शहरातून खंडणी साठी अपहरण झाल्याने खळबळ उडाली असून हे प्रकार पाहून खरंच बीड चा बिहार झालाय या चर्चेला पुष्टी मिळते आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी साठी परळी पोलीस स्टेशन समोर व्यापारी व नागरिक मोठा जमाव जमा झाला आसून आरोपी हे मराठी बोलत होते आशी माहिती मिळाल्याने ते याच परिसरातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
