ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी मारकडवाडी येथील ग्रामस्थांना नतमस्तक होऊन त्याच ठिकाणहुन देशभर लॉंग मार्च काढणार
ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी मारकडवाडी येथील ग्रामस्थांना नतमस्तक होऊन त्याच ठिकाणहुन देशभर लॉंग मार्च काढणार

सोलापूर:- (प्रतिनिधी)
ईव्हीएमच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस सह देशभरातील विरोधी पक्ष एक होताना दिसत असून
ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकत देशभर जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असून याचा शुभारंभ मारकडवाडी ग्रामस्थांना नतमस्तक होऊन या ठिकाण हुन करणार असल्याची माहिती सूत्रा कडून प्राप्त झाली आहे.
राज्यभर महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असताना राज्य व देशभरातील न्यूज चॅनलचे एक्सिटपोल ही महायुती आणि महाविकास आघाडीला समसमानच्या आसपास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत असताना नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणुकी मध्ये सर्वच
एक्सिटपोलचे अंदाज ही फोल ठरले आणि कोणाच्या स्वप्नात ही वाटत नव्हते एवढ्या प्रचंड बहुमताने राज्यात महायुतीला जागा मिळाल्या. हिच परस्थिती काही महिन्यांपूर्वी हरियाणा राज्यात पहावयास मिळाली. महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्य भरात खळबळ उडाली असून या संदर्भात ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या जात आहे.

ईव्हीएमच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस सह देशभरातील विरोधी पक्षात एकमत झाले असून या आंदोलनाचे रणशिंग फुंकत देशभर जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असून या लॉंग मार्चचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस मतदार संघातील मारकडवाडी या गावा मधून
करण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे आणि याचे कारण म्हणजे
या मतदार संघात भाजप महायुतीच्या बाजूने राम सातपुते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून उत्तम जानकर निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत उत्तम जानकर यांचा विजय झाला आणि राम सातपुते यांचा पराभव झाला तरीही मतदार संघातील अनेक गावांत ईव्हीएम मशीन विषयी शंका घेण्यात येऊ लागली.

या गावा पैकी एक गाव म्हणजे मरकडवाडी आणि याच गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका घेऊन राम सातपुते यांना गावातून एवढं मतदान पडूच शकत नाही असा ग्रामस्थांनी दावा करत ईव्हीएम मशीन वर नोंदल्या गेलेले मतदान हे मान्य नसल्याने मारकडवाडी ग्रामस्थांनी सर्वानुमते ठराव घेऊन 3 डिसेंम्बर रोजी बँलेट पेपर वर चाचणी मतदान घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या कडे केली होती, मात्र प्रशासनाने ती अमान्य केली होती. या साठी उत्तम जानकर गटाने स्व खर्चांने मतपत्रिका छापून घेतल्या होत्या. मतदात्यांनी 20 तारखेला ज्याला मतदान केलं त्याच उमेदवाराला बँलेट पेपर मतदान करावे असे आवाहन करण्यात आले होते.
ही मतदान प्रक्रिया पार पडली असती तर राज्यातील हा पहिला प्रयत्न यशस्वी झाला असता. ही प्रक्रिया पार पडली असती तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असत. मात्र प्रशासनाने दबाव तंत्र वापरून ग्रामस्थांचा डाव मोडीत काढला.

गावात 5 डिसेंम्बर पर्यंत जमावबंदी लागू केल्याने गावात पोलिसांचा एवढा फौज फाटा तैनात करण्यात आला होता की गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामस्थ मतदानावर ठाम असल्याने सकाळ पासूनच तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने जमा होताना दिसत होते. पोलीस अधिकारी दबाव आणण्या साठी मतदान सुरू होताच मतदानाला आणलेले सर्व साहित्य जप्त करण्याच्या तयारीत होते.
प्रशासनाला सहकार्य तरीही 200 जनावर गुन्हे दाखल
या वेळी उत्तम जानकर यांनी चिघळत चाललेली परस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करत निवडणूक प्रक्रिया मागे घेत असल्याचे जाहीर करून या दबाबाच्या विरोधात न्यायालयाची लढाई लढणार असल्याचे सांगितले व आंदोलन मागे घेतले तरीही पोलीस प्रशासनाने दुसरे दिवशी उत्तम जानकर सह 200 जनावर गुन्हे दाखल केले.
ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकत काँग्रेस नेते राहुल गांधी मारकड वाडी मधून लॉंग मार्च काढणार

ईव्हीएमच्या विरोधात मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी पहिले पाऊल उचलून देशात इतिहास घडवला त्यामुळे
ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकत देशभर जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असून याचा शुभारंभ मारकडवाडी ग्रामस्थांना नतमस्तक होऊन या ठिकाण हुन करणार असल्याची माहिती सूत्रा कडून प्राप्त झाली आहे.
