बीडच्या तरूणाईत प्रतिकूलप रिस्थितीला अनुकूल करण्याची क्षमता -आदित्य जीवने यांचे उद्धार
बीडच्या तरूणाईत प्रतिकूलप रिस्थितीला अनुकूल करण्याची क्षमता -आदित्य जीवने यांचे उद्धार
दोन दिवसीय जिल्हा युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
बीड : (प्रतिनिधी)
बीडच्या युवांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. प्रतिकुल परिस्थितीतही ते अनुकुल परिस्थिती निर्माण करू शकतात. या क्षमतेचा, कलागुणांचा युवकांना त्यांच्या जीवनात फायदा होतोच. युवा महोत्सवातून अशा गुणवत्ता, क्षमतेला वाव मिळतो. त्यातूनच उज्ज्वल देश घडण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजन यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हा युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. जीवने बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कारार्थी डॉ.सतीश साळुंखे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जे.पी.शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा युवा अधिकारी अरूणा कोचुरे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. श्याम टरके, राज्य तायक्वाँदो असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश बारगजे, राज्य युवक पुरस्कारार्थी तत्वशील कांबळे, ज्येष्ठ क्रीडा संघटक दिनकर थोरात, साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रीमती डॉ. कविता कराड आदींची उपस्थिती होती.
युवा महोत्सवात सहभागी स्पर्धकांच्या कलागुणांना परीक्षकांनी योग्य वाव द्यावा. राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्यासाठी युवांमध्ये प्रेरणा निर्माण करावी, असे आवाहनही श्री. जीवने यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा इतिहास व विकास यावर उपस्थितांना श्री. शेळके, डॉ.साळुंके यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेचे बीज रूजविण्यासाठी युवा महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, असेही त्यांनी भाषणातून सांगितले. प्रास्ताविक श्री. विद्यागर यांनी केले. यामध्ये त्यांनी शासनाचा युवा महोत्सवामागील उद्देश आणि दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा याबाबत सविस्तर माहिती दिली. सुरूवातीला नटराज मूर्तीचे पूजन, त्यानंतर दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. साक्षी कराड आणि काव्या डोंगरे यांच्या नृत्य कलेने कार्यक्रमाचा समारोप झाला. आभार श्रीमती कोचुरे यांनी मानले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून अरूण दैतकार, दीपक जमदाडे, विलास सोनवणे, राम गव्हाणे, डॉ. केशव भागवत, संतोष मस्के, प्रा. श्रीकांत पुरी, राधाकृष्ण वाघ, सुमित गायकवाड, लक्ष्मीकांत दोडके, डॉ. संजय कांबळे, रोहिणी धारमोडे, पूनम वोहरी, संदीप परदेशी, राजेंद्र इंगळे काम पाहणार आहेत. त्यांचाही यावेळी आयोजकांच्यावतीने पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
महोत्सव यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण, क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, कालिदास होसुरकर, रेवननाथ शेलार, सतीश राठोड, अविनाशा पाटील, कार्यालय अधीक्षक धनेश करांडे, त्रिगुणा वाघमोडे, क्रीडा संयोजक जितेंद आराक, सचिन जाधव , किशोर काळे , मंगेश वडमारे, राजेश बागलाने आदी पुढाकार घेत आहेत.
