ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळा मध्ये ही लाडक्या बहिणींना स्थान मिळणार, आ.पंकजाताई मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल.

मंत्रिमंडळा मध्ये ही लाडक्या बहिणींना स्थान मिळणार, आ.पंकजाताई मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल.

मुंबई:- (प्रतिनिधी)
   महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात सरकार स्थापन होणार आहे या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात भेटीगाठी बैठका गुप्त बैठका लॉबिंग शिफारशी चर्चा अशा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत याच अनुषंगाने काही वेळापूर्वी मोठी घडामोडी घडली असून भाजपाने त्या पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटीसाठी दाखल झाल्या आहेत.
   राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे.
    राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतचं उत्तर गुलदस्त्यात आहे. तर राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आसून मंत्री पदासाठी 1) अदिती तटकरे 2) पंकजा मुंडे 3) मनीषा कायंदे 4) माधुरी मिसाळ 5) भावना गवळी 6) देवयानी फरांदे 7) श्वेता महाले 8) नमिता मुंदडा या महिला आमदारा पैकी कोण कोणत्या लाडक्या बहिणीची वर्णी लागते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
   या अनुषंगाने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दोन दिवसात सरकार स्थापन होणार असून कोणाची मंत्रीपदीवर वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे काही वेळापूर्वी दाखल झालेल्या असून या
दोन ठिकाणी सरकार स्थापनेबाबत या दोन नेत्यांमध्ये निश्चितच चर्चा होणार आहे. भेटीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी संभावित मंत्रिमंडळ रचना व सरकारच्या संबंधाने या दोघात चर्चा होईल अशी शक्यता आहे. नेमकी ही भेट कशासाठी आहे? आणि काय चर्चा झाली? हे पंकजा मुंडे बाहेर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!