डीसीएस मोबाईल ॲपद्वारे होणार ई-पीक पाहणी
डीसीएस मोबाईल ॲपद्वारे होणार ई-पीक पाहणी

बीड, दिनांक 01 (जिमाका) : रब्बी हंगाम एक डिसेंबर 2024 पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरूस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नंतर 100 टक्के पीक पाहणी सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी. जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.
· पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आसून पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे
शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहायक उपलब्ध असेल, असेही प्रशासनाने कळवले आहे.