ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री वादा वरून महायुतीच घोडं काही पूढे जाईनां काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा रुसवा कोण आणि कसा काढणार? आणि राज्यात सत्ता स्थापन कधी होणार?

मुख्यमंत्री वादा वरून महायुतीच घोडं काही पूढे जाईनां

काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा रुसवा कोण आणि कसा काढणार? आणि राज्यात सत्ता स्थापन कधी होणार?

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
      मुख्यमंत्री वादा वरून महायुतीच घोडं काही पूढे जाण्यास तयार नसून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव गावाकडे जाऊन बसलेले काळजीवाहू मुख्यमंत्री यांचा रुसवा कोण आणि कसा काढणार ? आणि राज्यात सत्ता स्थापन कधी होणार या कडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
     नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप महायुती सरकारला अभूतपूर्व यश मिळाल्या नंतर आणि यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा मोठा पक्ष बनल्या नंतर निकाला नंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील असा सर्वाना अंदाज वाटत होता मात्र हा अंदाज आज तागायत सत्या मध्ये उतरलेला नाही.
यात एक पत्रकार परिषद घेऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून आपला दावा मागे घेत भाजपला मुख्यमंत्री बनवण्याची वाट मोकळी करून दिली खरी मात्र यातही एक रहस्य दडलेले असुन खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी अजून ही मुख्यमंत्री पदाचा दावा हा सोडलेला दिसत नाही.
     राज्यात सत्ता स्थापने संदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांच्या पंतप्रधान मा ना नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. मुख्यमंत्री पद बाजूला ठेऊन एकनाथ शिंदे यांना केंद्रात एक मंत्री पद आणि राज्यात गृह, अर्थ व ग्रामविकास या महत्वाच्या खात्यासह 12 मंत्रीपदे हवी आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटालाही गृह आणि अर्थ मंत्री पद हवे आहे आणि हे दोन्ही मंत्री पदे भाजप या दोघांना द्यायला तयार नाही.
     दुसरी कडे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुरलीधर मोहोळ, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचीही भाजपात चाचपणी सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री वादा वरून महायुतीच घोडं काही पूढे जाण्यास अजून ही तयार नाही. सत्ता स्थापने साठी न्यायालया प्रमाणे तारीख पे तारीख सुरू आसून आता 5 डिसेंम्बरचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे.
   दुसरीकडे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव एकनाथ शिंदे दरे या आपल्या गावाकडे जाऊन एकांत वासात बसले आहेत. प्रकृती अस्वास्थ्या सोबत त्या मागे त्यांची नाराजी हे एक कारण असून या घडामोडीवर लक्ष ठेवुन असलेले राजकारणा मधील चाणक्य शरदचंद्रजी पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पाठवून भाजप नेत्यांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण केलेला आहे.
    एकूणच काळजीवाहू मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे यांचा रुसवा कोण आणि कसा काढणार ? आणि राज्यात सत्ता स्थापन कधी होणार या कडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!