मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे ईव्हीएम हॅक करता येते, महादेव जानकर यांचा वृत्त वाहिन्यांच्या मुलाखती मध्ये दावा
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे
ईव्हीएम हॅक करता येते, महादेव जानकर यांचा वृत्त वाहिन्यांच्या मुलाखती मध्ये दावा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ईव्हीएम हॅक करता येते असा दावा मागील काही वर्षे महायुतीचा घटक पक्ष राहिलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व सॉफ्टवेअर इंजिनिअर महादेव जानकर यांनी वृत्त वाहिण्याला दिलेल्या मुलाखती मध्ये केला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मागील काही वर्ष भाजप महायुती मध्ये घटक पक्ष म्हणून निवडणुका लढवल्या असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये जागा वाटपात तडजोड न झाल्याने जानकर यांनी महायुती मधून बाहेर पडून स्वतंत्र निवडणुका लढवल्या, या मध्ये महायुतीला मिळालेले महाभयंकर यश हे सर्व पक्षा साठी चिंतनीय विषय ठरला असून प्रसार माध्यमे ही याचा शोध घेत आहेत. या संदर्भात काही वृत्त वाहिन्यांनी महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची मुलाखत घेतली व ईव्हीएम हॅकिंग संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आय एम अलसो सॉफ्टवेअर इंजिनिअर ईव्हीएम काय प्लेन सुद्धा हॅक करता येत असं उत्तर देत लोकशाहीचे चार खांब न्यायालय, निवडणूक आयोग, मीडिया त्यांचा आहे त्या साठी लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बँलेट पेपर वरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केंद्र व राज्य सरकारला केली.
भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला आजिबात पडायचं नाही. मात्र, अनेक ठिकाणी EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी जानकर यांनी केला. ते म्हणाले, ‘EVM वर माझा आक्षेप असून देशभरात EVM विरोधात आंदोलन करणार आहे. EVM मुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. EVM हॅक करता येत, मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहिती आहे, असा दावा करून जानकर यांनी महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळल्याने दिसून आले.
Post Views: 200