पन्नास किलोच्या तांदळाच्या पोत्यात 10 किलोची तूट आरोप खोडीत काढत व्हायरल फोटो वाटपाच्या वेळेसचा असल्याचे तहसीलदार यांचे म्हणणे
पन्नास किलोच्या तांदळाच्या पोत्यात 10 किलोची तूट आरोप खोडीत काढत व्हायरल फोटो वाटपाच्या वेळेसचा असल्याचे तहसीलदार यांचे म्हणणे
अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
येथील शासकीय गोदामातुन स्वस्त धान्य दुकानदारास दिल्या जाणाऱ्या 50 किलो गहू व तांदळाला कट्ट्या मध्ये तब्बल 10 किलोची तूट येत असून 40 कोलो माल असलेला कट्टा दुकान दाराच्या माथी मारला जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्या नंतर या संदर्भात तहसीलदार विलास तरंगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी 1 ते 2 किलोची तूट येऊ शकते, व्हायरल झालेला फोटो हा वाटपाच्या वेळीचा आसल्या संदर्भात खुलासा केला आहे.
शासनाच्या वतीने गरीब नागरिकांना मोफत देण्यात येणाऱ्या गहू व तांदळाच्या पोत्यातून धान्य गायब होवू लागले आसून अंबाजोगाईच्या गोदाम रक्षक म्हणून एस.आर.बलुतकर यांची ऑर्डर झालेली असतानाही अन्य व्यक्तीस हा पदभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे या गोदामात सध्या सावळा गोंधळ सुरू आसून शासनाकडून पन्नास किलोच्या पोत्यामधील दहा किलो धान्य गायब होत असल्याचा प्रकार व्हायरल झालेल्या एका फोटो मुळे नुकताच चर्चेत आला.
शासकिय धान्य घोटाळ्यात बीड पासून स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा बरबटली असून याकडे कोणी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. शासनाकडून नियमाप्रमाणे एका पोत्यामध्ये पन्नास किलो धान्य व पाचशे ग्रॅम पोत्याचे वजन क्रम बाह्य आहे. परंतु अंबाजोगाईच्या गोदामातून चाळीस किलो धान्य व पोत्याचे 240 या प्रमाणे धान्य स्वस्त धान्य दुकानदाराला वाटप होत आसल्याचे शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याती येल्डा येथील ग्रा.प.कार्यालया अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला दिलेले धान्य पोत्यासह काट्यावर मोजमाप केले असता चाळीस किलो धान्य निघाल्याची व उर्वरीत दहा किलो धान्य कोणाच्या घशात गोदाम रक्षक घालित आहे याची चर्चा सुरू झाली.
या संदर्भात तहसीलदार विलास तरंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार होऊ शकत नाही, धान्याच्या पोत्यात 1 किंवा 2 किलोची तूट येऊ शकते, व्हायरल झालेला फोटो हा सोन्नर नामक दुकान दाराच्या वाटपाच्या वेळेसचा असल्याची माहिती मिळाली आहे तरीही नायब तहसीलदार यांना चौकशीचे आदेश दिले आसून निवडणूक काळातील कामा मुळे बदलून आलेले गोदाम रक्षक बलुतकर यांना पदभार देण्यात आला नव्हता तो लवकरच देण्यात येईल असे त्यांनीं सांगितले.
