*आ. नमिता मुंदडांनी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळविल्या रुग्णवाहिका*
*निवडणुका संपल्या.. नाऊ बॅक टू वर्क!*
*आ. नमिता मुंदडांनी आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळविल्या रुग्णवाहिका*
अंबाजोगाई – निवडणुका संपल्या आणि अवघ्या चार दिवसातच केज विधानसभा मतदार संघाच्या कार्यतत्पर आमदार नमिता मुंदडा पुन्हा कामाला लागल्या आहेत. आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे केज मतदार संघातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत.
आ. नमिता मुंदडा यांनी त्यांच्या पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. मतदार संघातील अनेक आरोग्य केंद्रांची दर्जोन्नती झाली. त्यासोबतच आ. मुंदडा यांनी रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत यादृउष्टीने प्राथमिक केंद्रांना रुग्णवाहिका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मतदार संघातील केज तालुक्यातील आडस, बनसारोळा, चिंचोली माळी, राजेगाव, विडा, युसुफ वडगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, भावठाणा अशा एकूण आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. मागणीला प्राधान्य देऊन रुग्णवाहिका मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, निवडणुकानंतर अवघ्या चार दिवसातच आ. मुंदडा यांनी अभिनंदन, सत्कार याचे सोपस्कार पार पाडत असतानाच कर्तव्याकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले. उर्वरित आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आ. मुंदडा यांनी सांगितले आहे.
