कृषी औद्योगिक क्रांती ही यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाली-डॉ. -मोहनराव पाटील.
कृषी औद्योगिक क्रांती ही यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाली-डॉ. -मोहनराव पाटील.
आंबाजोगाई(प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्त होणारी ही शेतकरी परिषद खर पहाता यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर असून,ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे या साठी ही परिषद महत्वाची आहे,हे मार्गदर्शन
कृषी महाविद्यालयात धाराशिव चे माजी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. मोहनराव बी.पाटील यांनी केले.आंबाजोगाई मध्ये सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या वतीने आयोजित शेतकरी परिषदेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर आंबेजोगाई तालुक्यातील आवाड शिरपूर येथील प्रगतशील शेतकरी व ऊस उत्पादक मा. पांडुरंग आवाड होते.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मुबंई येथील यशवंतराव चव्हाण केंद्राचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ हे होते.
या शेतकरी परिषदेचे आयोजन आंबाजोगाई चे प्रगतशील शेतकरी व यशवंतराव स्मृती समारोहाचे कोषाध्यक्ष सतिष लोमटे यांनी केले होते. या परिषदेचे प्रस्ताविक सतिष लोमटे यांनी केले.गेल्या 40 वर्षांपासून अविरत पणे चालू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहा निमित्त ही शेतकरी परिषद सुद्धा आयोजित केली जाते.
1985 पासून या व्याससपीठावर शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व पीक प्रदर्शन आयोजित करण्यात येते.सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही परिषद माहिती देण्याचे काम करते असे सतिष लोमटे म्हणाले.डॉ. मोहनराव पाटील यांनी ‘ फळबाग पीक-लागवड पद्धती,संवर्धन व बाजारपेठ’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड यांनी ‘ऊस लागवड पद्धत स्वानुभव व शेतकऱ्यांना झालेला फायदा’
या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मोहनराव पाटील पुढे म्हणाले की 2023 मध्ये पृथ्वी चे तापमान अत्यंत झपाट्याने वाढत आहे.पृथ्वी तापमान वाढी मुळे होरफळत आहे.हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.याच कारण सांगताना ते म्हणाले की दक्षिण आफ्रिकेतील अमेझॉन नदी ही पृथ्वी चे फुफ्फुस आहे.परंतु येथील जंगलांना लागलेली आग व अमेझॉन नदीच्या किनाऱ्यावरील वनराई नष्ट होत चालल्यामुळे वाढते तापमान सर्व सजीवांसाठी घातक आहे.फळ बागांच्या लागडीत लिंबू वर्गीय मोसंबी, आंबा,सीताफळ व ड्रगण फ्रुट ही फळे आपल्या हवामानात जोमाने वाढणारी आहेत.
आंब्याचा जन्म भारतातील असल्याने इस्राईल देशाचे मार्गदर्शन घेण्याची गरज नाही.धाराशिव केसर आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. त्या नंतर संभाजी नगर सुध्दा पुढे आहे.ग्लोबल विकास ट्रस्ट सिरसाळा फळबागा करिता 50% सबसिडी देते त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.माती तपासूनच पीक लागवड करावी.फळबागा तील फळांचे प्रोसेसिंग करून लोणचे, पल्प,रस,वड्या, आईस्क्रीम,रबडी, पावडर साठी मार्केटिंग करता येते.ड्रगण सारखे फळ अँटीऑक्सिडंट म्हणून आरोग्यासाठी चांगले आहे.
पांडुरंग आवाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
उसाची लागवड योग्य रितीने केल्यास व ठिबकद्वारे पाणी दिल्यास एकरी शंभर टना पेक्षा जास्त उत्पादन घेता येते.ऊस या पिकां मध्यें जगाला चालविण्याची क्षमता आहे.कारण मानवी शरीरासाठी साखर महत्वाची आहेच, परंतु 4 हजार मेगावाट विद्युत ऊर्जा,इथेनॉल,सीएनजी,ग्रीनहायड्रोजन,विमानाचे इंधन या सारखी इंधने उसापासून मिळवता येतात.परंतु शेतकऱ्यांनी माती,पाणी परीक्षण करून स्वतः शेतकरी शेतात उतरला पाहिजे, केवळ बांदावर उभे राहून शेती करता येत नाही.
जग बंद पाडण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. परंतु शेतकऱ्यांला त्याची शक्ती समजली पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात दत्ता बाळ सराफ यांनी दोन्ही मार्गदर्शकांची स्तुती करुण.
खरे विश्वगुरू तर ही माणसे आहेत.जे आपल्या शेतीला व जगण्याला विज्ञानाची जोड देत आहेत.महाराष्ट्र मध्ये देशाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे.फक्त डेटा वर बारकाईने काम करता आले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा मराठवाडा प्रगत होईल फक्त मार्केटिंग मध्ये शेतकरी पुढे आला पाहजे.ऑर्गणीक विचारवंत निर्माण झाले पाहिजेत.
हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या मॉडेल वर चालतो आहे.या कार्यक्रमाचे संचलन राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.आभार श्याम शिंदे यांनी मानले. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी गोविंद भाऊ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
