Skip to content
राज्याला नवी दिशा देणारे यशवंतरावांचे नेतृत्व
—-तुषार गांधी
—–
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उदघाटन
—
अंबाजोगाई, दि. २५ (प्रतिनिधी) राज्यात पुरोगामीत्वाचे विचार पेरण्यात यशवंतराव चव्हाणांचे योगदान आहे. राज्याला नवी दिशा देणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. असे प्रतिपादन तुषार गांधी यांनी सोमवारी येथे केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या तीन दिवसीय स्मृती समारोहाचे उदघाटन तुषार गांधी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चित्रपट अभिनेते किरण माने हे होते. समितीचे सचिव दगडू लोमटे व उपाध्यक्ष प्रा. कमलाकर कांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तुषार गांधी म्हणाले, की व्यक्तीचा आदर्श महत्वाचा असतो. आजच्या राजकारणात संविधानाचा अवमान करणारे नेते दिसतात. यशवंतरावांनी नेहमी संविधानाचा आदरच केला. सध्या देशात चाललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना गांधी म्हणाले, किती दिवस मंदिर मज्जीत वादात अडकून राहणार, फक्त एकतेचे चर्चा करून काय उपयोग, पण आपल्या वागण्यातून व कर्तव्यातून एकता दिसत नाही ? देशात जे आराजकता घडते, त्यावर आपण का का गप्प बसता, एक नागरीक म्हणून स्वत:ला प्रश्न विचारा असे आवाहनही त्यांनी केले.
किरण माने म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व विचारांशी निष्ठा असणारे होते. आजच्या राजकारणात ही निष्ठा व विचार संपलेला दिसतो. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व संवेदनशील व
कलावंतांची तरलता असलेले होते. साहित्यांची त्यांना जाण होती.असेही त्यांनी सांगितले.
समारोहाचे प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. ४० वर्षापासून सुरू झालेल्या समारोहाचा त्यांनी आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत सतीश लोमटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मेघराज पवळे यांनी केले.
Post Views: 209
error: Content is protected !!