संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुले सह पाच आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 2 जण अटक
संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुले सह पाच आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 2 जण अटक

केज – (प्रतिनिधी)
तालुक्यातील संतोष पंडीतराव देशमुख यांच्या निर्दयी हत्येप्रकरणी सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक होत नसल्याने केज तालुक्यातील ग्रामस्थात प्रचंड रोष आहे. केज शहरात आणि मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस निरीक्षक उस्मान शेख, प्रशांत महाजन यांना आदेशित करून आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली आहेत.
सदरील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत असतांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता. केज) आणि महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी ता धारूर) या टोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून इतर आरोपींची माहिती घेण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. गुन्हयात सहभागी प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले आहे.
