*केज विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सदैव कटिबद्ध –आ.नमिता मुंदडा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
मागील 5 वर्षात केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता अडीच हजार कोटीच्या जवळपास निधी खेचून आणला असून
मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे मत
भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून राज्यातील मतदार राजा उद्या आपल्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी निवडून हे राज्य कोणाच्या हाती दयायच याचा निर्णय घेणार आहे.
या संदर्भात बोलताना केज विधानसभा मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा म्हणाल्या की मागील 5 वर्षात मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्या सहकार्याने जो अडीच हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला तो मतदार संघातील वाड्या वस्त्यावर पोचवून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला गेला असून
मतदार संघातील प्रत्येक गावात सिमेंट, डांबरी रस्त्यासह अनेक विकास कामे झाली आसून बरीच कामे सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लागणार असून मतदार संघातील आरोग्य सेवेचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. केज विधानसभा मतदार संघाच्या विकासाच मॉडेल माझ्या कडे तयार आहे आणि त्यामुळेच निवडणूक प्रचारा दरम्यान मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या आडी अडचणी समजून घेऊन सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत सर्व नेत्यांसह या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तींचा ज्यांचा वयक्तिक संपर्क आहे असे नंदकिशोर मुंदडा काकाजी व अक्षय मुंदडा यांच्या सह हजारो कार्यकर्ते माझ्या साठी मतदान रुपी आशीर्वाद मागत आहेत. भविष्यात केज, अंबाजोगाई शहर परिसरासह मतदार संघातील एकही गाव विकासा पासून वंचित राहणार नाही या साठी प्रयत्नशील राहून प्रत्येक गाव खेड्यांचा विकासकामांतून कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे मत आ.नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले आहे.
