*विकासकामांच्या बळावरच नमिता मुंदडा यांचे पारडे जड, केज मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी उत्स्फुर्त स्वागत व प्रतिसाद*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या बळावर नमिता मुंदडा यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहेत. या निवडणुकीत 25 उमेदवार निवडणूक लढवत असले तरी नमिता मुंदडा यांनी मतदारसंघात आजवर केलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांची त्यांना पसंती पहावयास मिळत आहे. बुधवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी नमिता मुंदडा यांनी केज तालुक्यातील सारूकवाडी, डोका, हादगाव, सातेफळ, मांगवडगाव, आणि लाखा या गावांचा दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उस्त्फुर्त स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी विकासकामांच्या बळावर त्यांचे पारडे जड झालेले पहायला मिळत आहे. यामुळे त्यांच्या विरोधकांची मात्र मोठी दमछाक झाली आहे. विकासकामांच्या जोरावर केज मतदारसंघातील जनता या निवडणुकीत देखील भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा यांनाच निवडून देणार असल्याचे मतदार बोलुन दाखवत आहेत. केज तालुक्यातील सारूकवाडी, डोका, हादगाव, सातेफळ, मांगवडगाव, आणि लाखा या गावांचा दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उस्त्फुर्त स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. या गाव भेटी दरम्यान गावातील तमाम मतदार बंधू-भगिनींशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी नमिता मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, प्रत्येक गावच्या ग्रामस्थांच्या चेहर्यांवरचं विश्वासाचं प्रतिबिंब पाहून माझ्या मनात अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. यावेळी येत्या २० तारखेला “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी, अशी विनंती मुंदडा यांनी केली आहे. या प्रसंगी तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.नमिता मुंदडा यांनी केलेल्या विकासकामांमुळे केज विधानसभा मतदारसंघातून त्या प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे. मुंदडा कुटुंबाचे समर्थक सध्या आमदार ताई सोबत प्रचारात सक्रिय आहेत. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्याकडे केज मतदारसंघात विश्वासू कार्यकर्त्यांची मजबूत फळी व संघटन आहे. मागील पाच वर्षांत केज मतदारसंघात केलेल्या सातत्यपूर्ण भरीव विकास कामांमुळे नमिता मुंदडा यांनी प्रचारात इतर उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. भाजपा नेत्या आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आशीर्वादाने व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांची खंबीर साथ व जनतेचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे नमिता मुंदडा यांचा विजय दिवसेंदिवस सुकर होत चालला आहे. अंबाजोगाई, केज व नेकनूर शहरातून प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केलेल्या विविध विकास कामांमुळे तसेच मंगळवारी झालेल्या केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी, आ.पंकजाताई व माजी खा.प्रितमताई यांच्या विराट प्रचार सभेमुळे आता त्यांना ही निवडणूक सोपी झालेली आहे आणि त्यांचेच पारडे जड झालेले आहे. यामुळे मुंदडा यांचा विजय आता कोणालाही रोखता येणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
=======================
=======================
