केज

हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड  कोणाला देणार पाठिंबा, केजवासीयांचे लक्ष

हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड  कोणाला देणार पाठिंबा, केजवासीयांचे लक्ष

केज/प्रतिनिधी

केज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनविकास परिवर्तन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड  कोणाला पाठिंबा  देणार याकडे नागरिकांचे लक्ष! याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांच्याकडे केज नगरपंचायतची सत्ता आहे व त्यांच्याकडे नगराध्यक्षा सह जवळपास नऊ ते दहा नगरसेवक आहेत.

गेल्या २५ वर्षापासून लोकसभेची निवडणूक, असो या विधानसभेचे निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीमध्ये हारुणभाई इनामदार यांची निर्णायक भूमिका ठरलेली आहे.

स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे व स्व. विमलताई मुंदडा यांनी देखील हारुणभाई इनामदार यांना सोबत घेऊन अनेक निवडणुका लढविल्या होत्या व निवडूनही आले होते. केज शहरासह मतदार संघामध्ये हारुणभाई यांना मानणारा मोठा वर्ग आहे व त्यांचा जनसंपर्क चांगल्या प्रकारे आहे सध्या केज नगरपंचायतची सत्ताही त्यांच्याकडेच आहे त्यांच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड आहेत.

२०२४ ची केज विधानसभा निवडणूक ही आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी नगराध्यक्षा सौ सीताताई  बनसोड यांना मिळवून लढवण्याची तयारी हारूणभाई इनामदार यांनी केली होती व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरला होता परंतु मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला म्हणून सीताताई बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे परंतु जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी अद्यापही कोणाला पाठिंबा द्यायचा आहे यावर निर्णय घेतलेला नाही.

दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक ३-०० वाजता जे.के. फंक्शन हॉल महात्मा फुले नगर केज येथे जनविकास परिवर्तन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या संवाद बैठकीच्या माध्यमातून हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड काय भूमिका घेणार आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व सीताताई बनसोड या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा,माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह अन्य कोणाला पाठिंबा देणार आहेत ते संवाद बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!