*केज मतदारसंघात एकच चर्चा..!* *विकासाच्या मुद्यावर आ.नमिता मुंदडा विजयी होणार*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदारसंघातील निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. निवडणूक होत असली तरी केलेल्या विकासकामांची पावती केज मतदारसंघातील जनता भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनाच देणार असल्याचे दिसून येत आहे. केज मतदारसंघात सध्या एकच चर्चा ऐकायला मिळत आहे ती म्हणजे विकासाच्या मुद्यावर नमिताताई मुंदडा या विजयी होणार व पुन्हा आमदार होणार.
आ.नमिता मुंदडा या त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे केज विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे. मुंदडा कुटुंबाचे समर्थक सध्या आमदार ताई सोबत प्रचारात सक्रिय आहेत. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजप महायुती, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) आणि मित्र पक्षाच्या केज विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्याकडे केज मतदारसंघात विश्वासू कार्यकर्त्यांची मजबूत फळी व संघटन आहे. मागील पाच वर्षांत केज मतदारसंघात केलेल्या सातत्यपूर्ण भरीव विकास कामांमुळे आ.नमिता मुंदडा यांनी प्रचारात इतर उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. तसेच लोकप्रिय नेत्या आ.पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे आशीर्वाद आणि भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांची खंबीर साथ आ.नमिता मुंदडा यांच्यासोबत असल्याने आ.मुंदडा यांचा विजय सुकर झाला आहे. असे वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे. अंबाजोगाई शहरातून प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते आ.नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहेत. आ.नमिताताई यांनी बुधवार, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी केज मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने लाडेगाव, होळ, मुलेगाव, लाडेवडगाव, बावची (ता.केज) या गावांना भेट दिली व सर्वांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
=======================
=======================
