केज

*माझा जन्म झाला आणि केज मतदार संघ राखीव झाला, संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला* *रमेश आडसकरांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर लोटला*

केज(प्रतिनिधी)
       दिपावली सनाचे औचित्य साधून स्व. बाबुरावजी आडसकर साहेबांनी आडस येथे सुरू केलेली स्नेह मिलनाची परंपरा आजही कायम असून आज या स्नेह मिलन प्रसंगी बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्या मधून आलेल्या अथांग अशा जनसमुदयाने आडसच्या गढीवर उपस्थिती लावून रमेश आडसकर यांना दीपावलीच्या व विधानसभा निवडणुकी मधील विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
      रमेश आडसकर यांना शुभेच्छा देण्यासाठी केजच्या अपक्ष उमेदवार सौ संगीता ठोंबरे, माजी आमदार मोहनराव सोळंके,  पृथ्वीराज साठे, केज प स सभापती अंकुश इंगळे, नगर पंचायत अध्यक्ष सिताताई बनसोड, गटनेते, हारून इनामदार, रमाकांत बापू मुंडे, उदयसिंग दीखत, दत्ता आबा पाटील, माजी अध्यक्ष शेषेराव फावडे, बबन भेया लोमटे, दिलीप काळे, कमलाकर कोपले, भारतराव पतंगे, दीपक शिंदे सह बीड जिल्ह्याच्या काना कोपऱ्या मधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या वेळी उपस्थित जनसमुदायला शुभेच्छा देताना रमेशराव आडसकर म्हणाले की, जीवनात किती जरी चढ उतार आले तरी बीड जिल्ह्याच्या मातीशी आडसकर परिवाराची जुळलेली नाळ ही कधीही कमी होणार नसून आपल्या मधील एक मेकांचा स्नेह कायम टिकून रहावा या साठी स्व बाबुरावजी आडसकर साहेबांनी सुरू केलेली दिवाळी स्नेह मिलनाची परंपरा आजही कायम असून आज उपस्थित  जनसमुदाय हे आडसकर परिवाराचे प्रेम दाखवतो त्यामुळेच आमची पुढील पिढीही हा आदर्श कायम ठेवेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे.

    आपल्या राजकीय प्रवासा बद्दल दुःख व्यक्त करताना आडसकर म्हणाले की संघर्ष हा माझ्या पाचवीला पुजलेला असून ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच्या दुसरे दिवशी पासून केज मतदार संप हा राखीव झाला जो की आज पर्यंत राखीवच आहे.
     लोकसभा निवडणूक लढलो, विधानसभा निवडणूक लढलो दोन्ही वेळा अपयश आलं तरी खचून न जाता दुसरे दिवशी पासून आपल्या माणसांच्या सुख दुःखात रमत गेलो. माजलगाव मतदार संघात मागील विधानसभा निवडणूकी मध्ये थोड्या मताने पराभव पत्करावा लागल्याने या मतदार संघात आमचा जुनाच संसार असून सर्व सामान्य लोकांना केंद्र बिंदू मानून स्व. बाबुरावजी आडसकर साहेबांनी काम केलं तसचं पुढेही काम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे विचार आता संपुष्टात आल्याने मी आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून माजलगावच्या मायबाप जनतेला आशीर्वाद मागतो आहे. मला या मायबाप जनतेने संधी दिल्यास निश्चित संधीच सोन करून दाखवल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास या वेंळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.
    या वेळी आडसकरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या वाहनांनी तीन तास वाहतूक जाम झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!