केज

पुढच्या वर्षीचा गौरी – गणपती व महालक्ष्मी आरास स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा स्व गोपीनाथ मुंडे सभागृहात घेणार – आ नमिता मुंदडा राजमुद्रा गणेश मंडळाने मिळवला पहिला येण्याचा मान

————————————-
केज / प्रतिनिधी :- केज शहरातही सांस्कृतिक चळवळ गतिमान व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत येथील लोकांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून पुढच्या वर्षीचा गौरी – गणपती व महालक्ष्मी आरास बक्षीस वितरण सोहळा नव्याने होत असलेल्या लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे सभागृहात घेऊ अशी ग्वाही आ नमिता मुंदडा यांनी दिली

वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केज शहरासाठी आयोजित गौरी – गणपती व महालक्ष्मी आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते रणजितसिंह पाटील , पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन , नेताजी शिंदे , डॉ वासुदेव नेहरकर , महादेव सूर्यवंशी , विष्णू घुले , विकास मिरगणे , मधुकर सिरसट , श्रावण जाधव , अभय कुलकर्णी , रामदास तपसे , धनंजय कुलकर्णी , हनुमंत सौदागर , यांची उपस्थिती होती

पुढे बोलताना आ मुंदडा म्हणाल्या कि ; केज शहरात यावर्षी प्रथमच गौरी – गणपती व महालक्ष्मी आरास व देखावा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असतानाही महालक्ष्मी आरास स्पर्धेत चाळीस पेक्षा जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदवला . त्यांनी यावेळी केलेल्या आरास या सामाजिक संदेश देणाऱ्या व कलात्मक होत्या तसेच गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे देखील नागरिकांचे प्रबोधन व आपला सांस्कृतिक वारसा प्रगल्भ असल्याचे दर्शवणारी होती आजचा बक्षीस वितरण समारंभ शासकीय विश्रामगृहात होत असला तरी पुढील वर्षी होणार बक्षीस वितरण सोहळा आपल्या हक्काच्या म्हणजेच शहरात नव्याने होत असलेल्या लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे सभागृहात घेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

गणेश मंडळांनी ईतर ठिकाणाहून देखावे आणून मोठेपणा न मिरवता स्व कल्पनेतून देखावे निर्माण करावेत व विशेषतः सजीव देखावे सादर करण्यावर भर द्यावा व आपल्या पुढच्या पिढीला समृद्ध वारसा देण्यासाठी व दिशा देणाऱ्या चाकोरीत काम करण्याची गरज असल्याचे परखड मत रणजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी अनुक्रमे पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या आलेल्या राजमुद्रा गणेश मंडळ , श्रीराम गणेश मंडळ , वक्रतुंड गणेश मंडळ व उत्तेजनार्थ चिंतामणी गणेश मंडळ , शिवसमर्थ गणेश मंडळ व शिवमल्हार गणेश मंडळ यांना रोख रक्कम , स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले

तसेच महालक्ष्मी आरास स्पर्धेत अनुक्रमे पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या आलेल्या लाटे जयश्री , प्रीती कलढोणे व सुवर्णा सांगळे , वर्षा राख व भक्ती डापकर यांच्यासह उत्तेजनार्थ कानमोडे जयश्री , वैशाली चवरे , सुनीता शिंदे यांचा रोख रक्कम , स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण इनामदार गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव सूर्यवंशी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!