*मा जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्य देशभरात 75 हजार तर अंबाजोगाई शहरात 151 रक्तदात्यांचे रक्तदान*
मा जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्य देशभरात 75 हजार तर अंबाजोगाई शहरात 151 रक्तदात्यांचे रक्तदान
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ह्रदयसम्राट मा जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्य आज देशभरात केमिस्ट असोसिएशनच्या वतीने 75 हजार रक्तदाते रक्तदान करणार असून केमिस्ट असोसिएशनचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अरुण आबा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 151 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
अंबाजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरातील अरुणोदय निवास हनुमान नगर या ठिकाणी आयोजित करण्यात करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ नमिता ताई अक्षय मुंदडा व संकेत मोदी यांच्या सह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
या वेळी बोलताना आ नमिताताई मुंदडा म्हणाल्या की, मनुष्याच्या शरीरात रक्ताची एवढी आवश्यकता आहे की माणूस त्या शिवाय जगूच शकत नाही. रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज भासू शकते, रुग्णालयातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सतत रक्ताचा तुटवडा भासत असतो व हीच गरज लक्षात घेऊन अंबाजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज मा जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्य संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अरुण आबा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जो रक्तदान शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आसून या पुढेही असोसिएशनने असेंच सामाजीक उपक्रम हाती घ्यावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले
या वेळी संकेत मोदी यांनी अंबाजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या या उपक्रमा बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष मुस्तफा यासीन शेख, सचिव पवन पुरुषोत्तम चोकडा, उपाध्यक्ष शहर अमोल श्रीशैल साखरे, उपाध्यक्ष ग्रामीण गंगाधर गारटे, सहसचिव कृष्णा बाबुराव मस्के, कोषाध्यक्ष रणजीत मंगे, सह कोषाध्यक्ष रुपेशकुमार रमेशचंद्र रामावत, प्रसिध्दी प्रमुख खुरेशी मोहम्मद मोहसीनोद्दीन, पीआरओ सुशिल बाबासाहेब शिंदे, अमित रामविलास मानधने, कलीम सलीम शेख यांच्या सह 25 होलसेल, 150 किरकोळ विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वा रा ती रुग्णालयातील शरीर विकृती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अरविंद बगाटे, रक्त केंद्र प्रमुख डॉ विनय नाळपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी डॉ सबोरी शिंदे, डॉ तेजश्री कुरतडकर, जगदीश रामदासी, शशिकांत पारखे, आनंद सीताप, सय्यद नजीर, किरण चव्हाण, सुशील कुमार, शेख बाबा, वाल्मिक कांबळे, पवन हजारे यांनी विशेष परीश्रम घेतले.
