कवी, लेखक देविदास सौदागर यांना डॉ. पी.डी. पाटील यांनी पाच लाखांचे केले आर्थिक सहाय्य
कवी, लेखक देविदास सौदागर यांना
डॉ. पी.डी. पाटील यांनी पाच लाखांचे केले आर्थिक सहाय्य
अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे हे ४० वे वर्ष होते. या समारोहाच्या समारोप समारंभामध्ये तुळजापूर येथील तरुण लेखक देविदास सौदागर यांस यशवंतराव चव्हाण स्मृती युवा गौरव पुरस्कार देण्यात आला. ज्यांना “उसवन” या लघुकांदबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे. तो आपला उदर निर्वाह टेलरिंग काम करून घर चालवतो. आजही त्याची आर्थिक परस्थिती तशी चांगली नाही. आई, वडील, पत्नी व मूलेबाळे असा परिवार आहे. पत्र्याच्या खोलीत तो शिवणकाम करतो. कर्णाच्या मनातलं व काळजात लेण्या कोरताना हे दोन कवितासंग्रह व एक लघु कादंबरी प्रकाशित आहे. या कादंबरीत शिंपी काम करणाऱ्या वर्ग ग्राहकांच्या रेडिमेड कपड्यामुळे वळल्यामुळे आर्थिक अडचणीत आला आहे याचे चित्रण या कादंबरीत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते देविदास याला यशवंतराव चव्हाण स्मृती युवा गौरव पुरस्कार दिला गेला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी समरोहाच्या आयोजांबद्दला अभिनंदन करून देविदास याला.पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली. साहित्य, संगीत. शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात ते सतत कार्य मग्न असतात. अत्यंत संयमी संवेदनशील, रसिक, श्रोते व संयोजक आहेत. देविदास याला ही मदत करून एक कर्तव्य पार पाडले आहे. यावेळी व्यासपीठावर विजय अण्णा बोराडे, बाबा भांड, पं. सतीश व्यास, सचिन ईटकर, दत्ता बाळ सराफ, समितीचे सचिव दगडू लोमटे उपस्थित होते. मराठवाड्यात सर्वदूर लेखक व वाचकांना या घोषणेची आनंदवार्ता प्रसिद्ध होताच डॉ. पी.डी. पाटील यांचे अभिनंदन होत आहे. देविदास सौदागर याला अत्यंत आर्थिक आधार देणारी घोषणा असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे व समितीच्या पुरस्कार निवडी बद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
