Skip to content
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ देण्यासाठी यापुढे अनेकविध प्रकारचे निकष लागणार आसल्याने अनेक बहिणी योजने मधून अपात्र होणार
मुंबई :- (प्रतिनिधी)
बँक खात्यावर साडेसात हजार रु पाठवणारे लाडके भाऊ राज्यात महायुतीची सत्ता येताच यापुढे आपल्या लाडक्या बहिणीला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ देण्यासाठी अनेकविध प्रकारचे निकष लावून या योजने मधून अपात्र करणार असल्याचे विश्वसनीय वृत आहे.
अडीच वर्षा पूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस, मा अजितदादा पवार यांनी चार महिन्या पूर्वी पुन्हा सत्तेत येण्यासाठी राज्यातील सर्व महिलांना खुश करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली या योजने अंतर्गत महायुती सरकारने वय वर्ष 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये पाठवण्याचा केवळ निर्णयच घेतला नाही तर प्रत्येक महिलांच्या बँक खात्यावर सहा महिन्याचे साडेसात हजार रुपये पाठवले. शासनाच्या या निर्णयाने राज्यातील लाडक्या बहिणी एवढ्या खुश झाल्या की त्यांना दाजीचा खिसा दरमहा तीन हजाराने कापल्या जात आहे हे विसरूनही गेल्या.
निवडणुकी दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणीला दरमहा 2100 रु देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे या लाडक्या बहिणीने निवडणुकी मध्ये महायुतीच्या झोळीत झोळी फाटे पर्यंत मतदान केलं व स्वप्नातही कोनाला वाटले नाही एवढ्या जागा जिंकून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं.
राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशा नंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयी सभेत आपल्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणीला देऊन या पुढे दरमहा 2100 रु देण्याचा पुनरुच्चारही केला. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते या बद्दल साशंकता आहे.
या योजने मुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा 45 हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याने राज्यात लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या यात राज्याची आर्थिक राजधानी असलेली मुबंई महापालिका एकदा ताब्यात आली की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी अनेकविध प्रकारचे निकष लावायचे आणि या योजने मधून 80 ते 90 टक्के भगिनी अपात्र करायच्या या पद्धतींने नियोजन बद्ध आखणी लाडके भाऊ आखत असल्याचे विश्वसनीय वृत आहे.
Post Views: 395
error: Content is protected !!