*संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 10 लाखा पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार 29 डिसेंबर रोजी बीड येथे बैठकीचे आयोजन- गणेश पुजारी*
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 10 लाखा पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार 29 डिसेंबर रोजी बीड येथे बैठकीचे आयोजन- गणेश पुजारी
*बीड* (प्रतिनिधी)
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गुरव समाजातील व्यवसाय करू इच्छिनाऱ्या होतकरू व गरजू युवक युवती साठी 1 ते 10 लाखा पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्या साठी 29 डिसेंबर रोजी बीड येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरव समाजातील अधिकाधिक गरजू युवक युवतींनी या बैठकीस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय गुरव समाज संघटनेचे राज्य संघटक गणेश पुजारी यांनी केले आहे.
गुरव समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यामुळे
राज्यातील सर्व जिल्ह्यात रहिवाशी असलेल्या गुरव समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा
लाभ मिळुन गुरव समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली असून
या महा मंडळाच्या वतीने गुरव समाजातील व्यवसाय करू इच्छिनाऱ्या होतकरू व गरजू मुला साठी 1 ते 10 लाखा पर्यंत बँक गॅरंटीने कर्ज पुरवठा करण्यात येणार असून प्राथमिक स्वरूपात महामंडळाच्या वतीने 1 लाखा पर्यंत विना बँक गॅरंटी सह कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे 29 डीसेंबर रोजी दुपारी 1 वाजता बीड येथील शासकीय विश्राम गृह या ठिकाणी आयोजित केलेल्या या बैठकीस समाजातील होतकरू मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा लीड बँकेचे अधिकारी ही उपस्थित राहणार असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी होतकरू युवकांनी बैठकीस येते वेळी गुरव समाजाचे जात प्रमाणपत्र व आधार कार्ड आणावयाचे आहे.
गुरव समाजातील अधिकाधिक गरजू युवक युवतींनी या बैठकीस उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय गुरव समाज संघटनेचे राज्य संघटक गणेश पुजारी यांनी केले आहे.
