संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला जिल्हाभरात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्वत्र बंद शांततेत, अनुचित प्रकार नाही
केज:-(प्रतिनिधी)
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला व्यापाऱ्यांनी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख व त्यांचे सहकारी शिवराज लिंबराज देशमुख हे चार दिवसा पूर्वी आपल्या चार चाकी मधून केज हुन मस्साजोग कडे जात असताना टोलनाक्या नजीक असलेल्या डोंनगाव फाट्या नजीक यांचा पाठलाग करणाऱ्या 3 वाहनांनी संतोष देशमुख यांच्या गाडीला आडवी गाडी लावली, लागलीच मागून आलेल्या काळी स्कारपीओ मधील हल्लेखोरांनी
संतोषचा जबरदस्तीने दरवाजा उघडून त्याला खेचले आणि स्कारपीओ मध्ये कोंबून ही सुसाट वेगाने केजच्या दिशेने रवाना झाली आणि अवघ्या 3 तासाच्या आत संतोषचा मृतदेह मिळाल्याची वार्ता कानावर येऊन धडकली आणि जिल्ह्याचे वातावरण तापले, केज व मस्साजोग येथे तब्बल 15 तास रास्ता रोको करण्यात आला.

मस्साजोग नजीकच्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी घटने पूर्वी 3 दिवस अगोदर झालेल्या भांडणा मधून ही संतोषची हत्या झाल्याचे समोर आले. मात्र ही हत्या एवढ्या भयान पद्धतीने झाल्याने समाज माध्यमावर आलेल्या फोटो मुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळू लागला. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह राज्य भरातून लोक संतोष च्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मस्साजोग कडे धाव घेऊ लागले.
या घटनेतील गुन्हेगार हे आ धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आल्याने हे वातावरण आणखी संतप्त होऊ लागले आणि यातूनच घटनेच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.
या बंद मध्ये जिल्हाभरातील सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
