एस पी साहेब, आपली गुप्तचर यंत्रणा झोपा काढते आहे की काय? हा सवाल आहे बीड जिल्यातील सर्व सामान्य जनतेचा
एस पी साहेब, आपली गुप्तचर यंत्रणा झोपा काढते आहे की काय? हा सवाल आहे बीड जिल्यातील सर्व सामान्य जनतेचा
वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसवायचा असेल संशयित कार्यकर्त्यांची घरझडती घेऊन घरातील घावटी कट्टे व अन्य हत्यारे ताब्यात घ्या
बीड (प्रतिनिधी)
एस पी साहेब, आपली गुप्तचर यंत्रणा झोपा काढते आहे की काय? हा सवाल आहे बीड जिल्यातील सर्व सामान्य जनतेचा. साहेब जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसवायचा असेल तर बहुसंख्य संशयित राजकीय कार्यकर्त्यांची घरझडती घेऊन त्यांनी घरात लपवून ठेवले घावटी कट्टे व अन्य हत्यारे ताब्यात घ्या गुन्हेगारीला आळा बसल्या शिवाय राहणार नाही.
आज सर्व राज्यभरात बीडची तुलना बिहार सोबत केल्या जातेय आणि त्याला कारणी भूत आहे ती जिल्हा भरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी. जिल्ह्यात जीवे मारण्याच्या धमक्या हा तर चिल्लर विषय बनला आहे, जीवे मारहाण खून, विनयभंग (खरा आणि खोटा), चोऱ्या, दरोडे, घुटका, मटका, चक्री गेम, क्लब, वाळू व राखेचे तस्करी या सह अन्य काही अवैध धंदे राज रोज सुरू आहेत.
हे सर्व धंदे करणारे कोण आहेत तर राजकीय नेत्यांचे बगल बच्चे आणि या मंडळीने आपल्या धंद्याची पाठराखण करण्या साठी काही प्रतिष्ठित गुंड पाळले आहेत. या गुंडाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. या गुंडा मुळे सामान्य माणसाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे, कोणाची तोंड उघडून बोलण्याची हिम्मत नाही.
हे सर्व गुंड हत्यार बाळगून आहेत. ते ही घावटी कटठ्या सह. आसे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेलाही परिचित नाहीत असे नाही. पण मांजरांच्या गळ्यात घंटी कोण बांधायची ? हा खरा प्रश्न आहे आज जिल्हा भरात परवाना धारक रिव्हॉल्वर वापरणाऱ्याची संख्या शेकडोने आहे मात्र घावटी कट्टे बाळगणारांची व लपवून ठेवलेल्यांची संख्या परवाना धारका पेक्षा जास्त असल्याची सर्वत्र चर्चा आहे आणि त्यामुळेच एस पी साहेब, आपली गुप्तचर यंत्रणा झोपा काढते आहे की काय? हा सवाल आहे आपल्याला बीड जिल्यातील सर्व सामान्य जनतेचा.
आज एस पी अविनाश बारगळ यांच्या अधिपत्या खाली जिल्हा भरात पोलीस यंत्रनेने कॉम्बिग ऑपरेशन राबवले आणि बहुसंख्य आशा संशयित राजकीय कार्यकर्त्यांची घरझडती घेतली तर निश्चित पणे त्यांच्या घरात लपवून ठेवले घावटी कट्टे आणि अन्य हत्यारे मिळून आल्या शिवाय राहणार नाही असे खाजगीत लोक बोलत असून जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसवायचा असेल तर मिशन घावटी कट्टा राबवून अशा कार्यकर्त्याला ताब्यात घ्यायला हवे आणि यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केल्या शिवाय गुन्हेगारीला आळा बसल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
Post Views: 296