संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, अमोल डूबे यांचे अपहरण या घटनेने बीड जिल्हा राज्यभर गाजत असताना बीडमध्ये जुन्या वादातुन चक्क गोळीबार, एक जण जखमी
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, अमोल डूबे यांचे अपहरण या घटनेने बीड जिल्हा राज्यभर गाजत असताना बीडमध्ये जुन्या वादातुन चक्क गोळीबार, एक जण जखमी
बीड – (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, अमोल डूबे यांचे अपहरण या दोन्ही घटनेने बीड जिल्हा राज्यात व बाहेर गाजत असतानाच काल रात्री बीडमध्ये जुन्या वादातुन चक्क गोळीबार केल्याची घटना समोर आली असून यात विश्वास डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे.
बीड शहरात डोंगरे व आठवले यांच्यात मागील काही दिवसा पासून जुना वाद आसून यापूर्वी दोन गटात मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
काल मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय डोंगरे यांनी आठवले यांच्या इमामपूर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याने डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. प्रकरणाचा अधिक तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने पेठ बीड पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेचे आदेश दिले. त्यानुसार पेठबीड पोलीस ठाण्यातील एक पथक जखमीचा जबाब घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे पहाटेच रवाना झाले आहे.
खरंच बीडचा बिहार होतोय
विधान सभा निवडणूक काळात ऍड माधव जाधव यांना झालेली मारहाण, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या घटनेला पवनचक्की प्रकल्पाची पार्श्वभूमी, परळी मधील प्रसिद्ध व्यापारी अमोल डूबे यांचे अपहरण या घटनाने बीड जिल्हा राज्यात व बाहेर गाजत असतानाच काल रात्री बीडमध्ये जुन्या वादातुन चक्क गोळीबार केल्याची घटना समोर आल्या मुळे खरचं बीडचा बिहार होतोय ? हा सर्वाना प्रश्न पडणे साहजिकच आहे.
Post Views: 310