ग्राहकाकडून जाहिरात असलेल्या कॅरिबॅगचे पैसे घेतल्यामुळे फस्ट क्राय डॉट कॉमला 10 हजाराचा दंड
ग्राहकाकडून जाहिरात असलेल्या कॅरिबॅगचे पैसे घेतल्यामुळे फस्ट क्राय डॉट कॉमला 10 हजाराचा दंड

बीड (प्रतिनिधी)- शहरातील एका ग्राहकाला फस्ट क्राय डॉट कॉमने सामान खरेदी केल्यानंतर जाहिरात असलेल्या कॅरिबॅगचे 10 रुपये 50 पैसे घेतले त्यावेळी ग्राहकाने या पैशाबाबत विचारणा केली असता अरेरावीची भाषा फस्ट क्राय डॉट कॉमकडून वापरण्यात आली त्यामुळे ग्राहकाने मा.जिल्हा ग्राहक आयोग बीड यांच्याकडे तक्रार दाखल केली यावेळी ग्राहक आयोगाने दिलेल्या दि.25 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निकालात फस्ट क्राय डॉट कॉमला 10 हजार रुपये दंड केला व कॅरीबॅगचे 10.50 पैसे निकालापासून 45 दिवसात देण्याचे आदेशित केले.
याबाबत माहिती अशी की, पियुष गौतम कोटेचा यांनी बीड शहरातील नगरनाक्यावरील फस्ट क्राय डॉट कॉम मार्फत फ्रँन्चाईसीचे मालक 1) सुमीत अभय समदरीया व 2) काजल सुमीत समदरीया यांच्या दुकानातून त्यांच्या मुलांसाठी खरेदी केली होती. सदरील सामान खरेदी केल्यानंतर दुकानदाराने त्यांच्याकडून कंपनीची जाहिरात असलेल्या कॅरीबॅगचे 10.50 पैसे बिलात वसूल केले त्यांनी त्याबद्दल जाब विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तर न देता अरेरावीची भाषा वापरली त्यामुळे पियुष गौतम कोटेचा यांनी सदरील सामनेवालाविरुद्ध बीड येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली यानंतर ग्राहक आयोगाने सामनेवाला यांना नोटीस बजावणी केली त्यानंतर बीड येथील सामनेवाला सदरील प्रकरणात हजर झाले व पुणे येथील मुख्य कार्यालयाचे अधिकारी सदरील प्रकरणात हजर न झाल्यामुळे सदर प्रकरणात त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आणि सदरील प्रकरणाची सुनावणी होवून मा.ग्राहक आयोगाने फस्ट क्राय डॉट कॉम शाखा-बीड यांना व मुख्य कार्यालय पुणे यांना संयुक्तिकरित्या व स्वतंत्ररित्या 10 हजार रुपये दंड केला व कॅरीबॅगचे पैसे निकाल दिनांकापासून 45 दिवसात देण्याचे आदेशित केले. सदरील तक्रारदार यांच्यातर्फे अॅड.बालाप्रसाद सारडा यांनी काम पाहिले व त्यांनी राज्य आयोग यांचे न्यायनिवाडे मा.आयोगात दाखल करुन सदरील न्यायनिवाड्याचा ग्राहक आयोगाने विचार करुन सदर निकाल घोषित केला. यामुळे जाहिरात असलेल्या कॅरीबॅगचे पैसे आकारणार्यांना चांगलाच दणका बसला आहे.
Post Views: 228