*बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर दुर्देवी मृत्यू*
बीड (प्रतिनिधी)
बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. बाळासाहेब शिंदे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर बीड विधान सभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे थांबले असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले, त्यानंतर शिंदे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शिंदे यांच्यावर शिंदेनगर येथील शेतामध्ये संध्याकाळी अंत्यविधी होणार असल्याची माहिती आहे.
