*17 नोव्हेंबर रोजी आष्टी येथे आयोजित 125 बटूंच्या भव्य राज्यस्तरीय गुरव समाज उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रमास 10 हजार गुरव समाज बांधव एकत्रित येणार*
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने आष्टी येथे 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित राज्यस्तरीय गुरव समाज उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव अण्णा गुरव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेल्या या देखण्या सोहळ्यास महाराष्ट्राच्या काना कोपऱ्या मधुन 10 हजार गुरव समाज बांधव एकत्रित येणार आहेत.
आष्टी तालुक्यातील गुरव समाज संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यां मुळे सन 2002 साली आष्टी तालुका गुरव समाज संघटना संस्था रजिस्टर झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमाला प्रारंभ केला.
पहिल्याच वर्षी संघटनेच्या वतीने आष्टी येथे भव्य उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या कार्याची चुणूक त्यांनी दाखवून
दिली. त्या नंतर दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, तिळगुळ कार्यक्रम, समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात या सह विविध उपक्रम राबवण्याची त्यांची परंपरा असुन आज पर्यंत संघटनेच्या वतीने सहा वेळा राज्यस्तरीय उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन केल्या मुळे आता पर्यंत 751 बटुवर उपनयन संस्कार करण्यात आले असून हे वर्ष
राज्यस्तरीय उपनयन संस्कार तथा मौजीबंधन सोहळ्याचे 7 वे वर्ष आहे.
17 नोव्हेंबर 2024 रोजी आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात हा राज्यस्तरीय गुरव समाज उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आसून कार्यक्रमाच्या अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर दौरा करून मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन व 751 बटूंचा उपनयन ्संस्कार केल्याचा अनुभव पाठीशी घेऊन राज्यभरात अन्यत्र होणाऱ्या उपनयन संस्कार तथा मौजीबंधन कार्यक्रमात बटूंच्या नांव नोंदणी साठी 5 हजार रुपये शुल्क आकारण्यात येते मात्र आष्टी गुरव समाज संघटनेने समाजातील गोरगरीब तळा गाळातील बंटुचा विचार करून नोंदणी शुल्क फक्त एक हजार पाचशे रुपये ठेवलेले आहे. या मध्येच बटूंना सोवळे उपरणे, टोपी, तांब्याचा गडू, ताम्हण, संध्यापळी, जानवे, मंडवळी, भिक्षावळ, झोळी, फुलांचे हार देण्यात येणार असून प्रत्येक बटु सोबत येणाऱ्या सर्व नातेवाईक व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या वर्षी होत असलेल्या या देखण्या सोहळ्यास 125 बटूंची नोंदणी करण्यात आली आसून 17 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता बटूंनी कार्यक्रम स्थळी म्हणजेच आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात हजर राहणे आवश्यक आसून सर्व बटूंची आष्टी शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मौजीबंधनाचा विधिवत कार्यक्रम होईल यावेळी राज्य भरातुन 10 हजार गुरव समाज बांधव एकत्रित येणार आसून यात आलेल्या मान्यवर नेत्यांचे समाज बांधवांना मार्गदर्शन होणार आहे.
आष्टी तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव गुरव, उपाध्यक्ष बापूराव क्षीरसागर, सचिव रामभाऊ शिर्के, कोषाध्यक्ष दादा माने, सहसचिव राजेंद्र शिंदे सर, नंदू मामा गुरव, संजू मामा गुरव, देविदास गुरव, संदीप भालेराव, दत्तोबा शिर्के, रामदास क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, दाही तोंडे गुरुजी, काकासाहेब भालेराव, सर्व शेलार बंधू यांच्या सह शेकडो समाजाचे कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
