जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. श्रीहरी नागरगोजे यांना “जेष्ठश्री” तर प्रताप पवार यांना “यशवंतश्री” पुरस्कार प्रदान
जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने डॉ. श्रीहरी नागरगोजे यांना “जेष्ठश्री” तर प्रताप पवार यांना “यशवंतश्री” पुरस्कार प्रदान
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील ख्यातनाम सर्जन डॉ. श्रीहरी नागरगोजे यांना मान्यवरांच्या हस्ते सन 2024 या वर्षीचा “जेष्ठश्री” तर प्रसिध्द यशस्वी उद्योजक समाज भान जपणारे श्री. प्रताप पुंडलीकराव पवार यांना “यशवंतश्री” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मासिक बैठकीत या पुरस्कार वितरण प्रसंगी जेष्ठ समाजवादी, आंतर भारतीचे प्रमुख. शेतकऱ्यांसाठी लढणारा संघर्षशील योध्दा श्री. अमर हबीब यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अॅड. अनंतराव जगतकर होते
या वेळी अमर हबीब यांनी जेष्ठ नागरिक संघ राबवित असलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या तर डॉ. नागरगोजे व प्रताप पवार यांनी सत्काराला उत्तर दिले. अध्यक्षीय समारोप ऍड अनंतराव जगतकर यांनी केला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सिमेवर लढणारे बलीदान प्राप्त सैनिक, दिवगंत प्रसिध्द सामाजिक आणि कलावंत आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी संघाच्या कार्याध्याक्षा डॉ. सुलभाताई खेडगीकर यांचीही उपस्थिती होती. जेष्ठ नागरिक संघाचे सचिव गोरे यांनी कार्यकारीणीचा एक वर्षाचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरूपात मांडला. सन्मान पत्राचे वाचन संतरामजी कराड आणि प्रा. बालासाहेब आगळे यांनी केले. सुत्र संचालन व आभार सौ. पुष्पा बगाडे यांनी केले.
Post Views: 202