डॉ. द्वारकादास लोहिया (बाबूजी) लोकसहभाग पुरस्कार वितरण व राष्ट्रीय जल परिषदचे आयोजन
डॉ. द्वारकादास लोहिया (बाबूजी) लोकसहभाग पुरस्कार वितरण व राष्ट्रीय जल परिषदचे आयोजन
अंबाजोगाई / वार्ताहर
पू. साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आणि डॉ द्वारकादास लोहिया (बाबूजी) यांच्या स्मरणार्थ मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) व मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. द्वारकादास लोहिया (बाबूजी) लोकसहभाग पुरस्कार वितरण व राष्ट्रीय जल परिषदचे आयोजन 24 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी, मानवलोक समाजकार्य महाविद्यालय रिंग रोड अंबाजोगाई जिल्हा बीड येथे करण्यात आले आहे.
सकाळी ठीक 10.00 वाजता राष्ट्रीय जल परिषद चे उद्घाटन केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा श्री दत्ता देशकर (संपादक मासिक जलसंवाद पुणे ), अध्यक्ष म्हणून श्री अशोकराव देशमुख (अध्यक्ष मानवलोक अंबाजोगाई ) यांची उपस्थिती आहे.
राष्ट्रीय जल परिषदेचे आयोजन एकूण चार सत्रात केले असून या चार सत्रामध्ये मुख्य विषय मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी लोकसहभाग हा घेऊन दुष्काळमुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थाचे योगदान ,सामान्यायी पाणी वाटप संकल्पना ,मराठवाड्यातील नदी खोऱ्याची स्थिती आणि दुष्काळ ,मराठवाड्यातील भूरचना आणि सिंचन ,ग्रामविकासातील जलसंधारण आणि महिलांचा सहभाग ,जल व्यवस्थापनातील लोकसहभाग आणि सिंचन व्यवस्था, नवीन शैक्षणिक धोरण आणि दुष्काळ मुक्ती ,जल प्रदूषणावरील नैसर्गिक उपाय ,आणि दुष्काळ शेती सिंचन व लोकसहभाग या उप विषयावर प्रकाश टाकून सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात 10:45 ते 11:45 च्या दरम्यान मराठवाड्यातील नदी खोरे व भूरचना या विषयावर चर्चा होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुमंत पांडे (भूतपूर्व कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीनिवास वडगबाळकर प्राचार्य (से.मी) दयानंद महाविद्यालय सोलापूर, तसेच रोहन पवार ( वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बीड) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दुसरे सत्र सकाळी 11:45 ते दुपारी 1 वाजता होणार असून जल व्यवस्थापन व महिलांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणारा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सिंग व जल सहेली टीम (अध्यक्ष- परमार्थ संस्था बुंदेलखंड झांसी, उत्तरप्रदेश) तर प्रमुख मार्गदर्शक मेधा जोशी ( सल्लागार तथा अभ्यागत प्राध्यापक यशदा, पुणे) तसेच अश्विनी कुलकर्णी (प्रगती अभियान, नाशिक) या मार्गदर्शन करणार आहेत.
सत्र तिसरे दुपारी 2 ते 3 यादरम्यान होणार असून जल व्यवस्थापनातील लोकसहभाग आणि सिंचन व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन होणारा असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित गोखले (शास्त्रज्ञ तथा संस्थापक नॅचरल सोल्युशन, पुणे), आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रदीप भलगे ( प्रोफेसर सिविल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाळूज छ. संभाजीनगर (औरंगाबाद ), तसेच शरद घुगे (संस्थापक – जय मल्हार सिंचन सहकारी संस्था, इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक) यांचे मार्गदर्शन होणार आहे. चौथ्या सत्रात शाश्वत विकास: जलसमृद्ध गाव या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मलिन्नाथ कलशेट्टी (भा.प्र.से संचालक- राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे) प्रमुख मार्गदर्शक डॉ. आनंद पुसावळे ( कार्यकारी- संचालक जलसाक्षरता केंद्र यशदा ,पुणे )यांचे मार्गदर्शन झाल्याच्या नंतर दुपारी 3:45 वा. डॉ. द्वारकादास लोहिया (बाबूजी) लोकसहभाग पुरस्कार वितरण संजय सिंग (अध्यक्ष- परमार्थ संस्था बुंदेलखंड झांसी उत्तर प्रदेश) यांच्या शुभ हस्तेसत्कारमूर्ती कृषी भूषण तथा जलतज्ञ मा. विजय (अण्णा) बोराडे ( सचिव मराठा शेती सहाय्यक मंडळ जालना) यांचा लोकसहभाग पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मलिन्नाथ कलशेट्टी (भा.प्र.से संचालक- राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे) तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र सिंह (भाईजी) जलपुरुष, राजस्थान,
यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तरी महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील तसेच बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष व जल अभ्यासक तसेच विद्यार्थी यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री अनिकेत लोहिया (कार्यवाह मानवलोक श्री ालासाहेब आगळे (सहकार्यवाह- मानवलोक ),डॉ. प्रकाश जाधव (प्राचार्य- मानवलोक समाजकार्य महाविद्यालय , अंबाजोगाई) डॉ. हनुमंत साळुंके (समन्वयक राष्ट्रीय जलपरिषद) तसेच सर्व मानवलोकचे संस्थेचे कार्यकारणी सदस्य ,कार्यकर्ते व मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
