डॉ. विवेक आशा घन:शाम घोबाळे यांना हिंदी विषयात ‘पीएच.डी.’ प्रदान
डॉ. विवेक आशा घन:शाम घोबाळे यांना हिंदी विषयात ‘पीएच.डी.’ प्रदान
अंबाजोगाई : डॉ. विवेक आशा घन:शाम घोबाळे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तर्फे दिनांक 17/12/2024 रोजी हिंदी विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी ”सुषम बेदी के गद्य साहित्य में अभिव्यक्त विविध विमर्श” या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
तसेच त्यांना डॉ. बाबासाहेब माने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी अध्यक्ष प्रोफेसर सदानंद भोसले, बाह्यपरिक्षक डॉ. संतोष गिरहे व संशोधन केंद्र समन्वयक प्रोफेसर ईश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तसेच यापूर्वी यांनी शिक्षण शास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथून संपादन केली केलेली आहे ही त्यांची द्वितीय पीएचडी आहे. याप्रसंगी प्रोफेसर विजयकुमार रोडे, प्रोफेसर गोरोबा खुरपे, डॉ. किर्तीराज लोणारे तसेच डॉ. विवेक आशा घनश्याम घोबाळे हे श्री संत गजानन अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई प्राचार्य पदावर कार्यरत असून यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शारदा कदम, संस्थेचे कार्यवाहक गणेश पवार, ॲड. विशाल घोबाळे, प्रा.अमोल राजपंखे व शिल्पा घोबाळे, रेखा घोबाळे, सूर्यकांत लाटे, विद्या घोबाळे व समस्त घोबाळे परिवार यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
