अविनाश बारगळ यांच्या बदली नंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे चॅलेंज
अविनाश बारगळ यांच्या बदली नंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे चॅलेंज
एखादा आय पी एस, आय ए एस दर्जाचा आधीकारीचं चॅलेंज स्वीकारू शकणार नसता ये रे माझ्या मागल्या
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विस्कटलेल्या कायदा व सुव्यवस्थे बाबत चिंता व्यक्त करून जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने त्या नंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे एक चॅलेंज असणार असून हे चॅलेंज फक्त एखादा आय पी एस, आय ए एस दर्जाचा आधीकारी दिला तरचं तो स्वीकारू शकेल अशी प्रतिक्रिया जनते मधून व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षात बीडची कायदा व सुव्यवस्था बिघडली ही बाब जिल्हा वासीयांना नवीन राहिली नाही मात्र याची भांडाफोड झाली ती संतोष देशमुख यांच्या हत्येने बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना शुक्रवारी (20 डिसेंबर) सभागृहात दोषींवर कठोर कारवाईचा ईशारा दिला. तसेच याप्रकरणातील दोषींवर मोक्का लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वाल्मिक कराड यांचा एका गुन्हयात सहभाग असून दुसऱ्या गुन्ह्यातील सहभाग आम्ही तपासणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे लोक आहेत, भूमाफिया आहेत अशा लोकांच्या विरुद्ध एक मोहीम हाती घेऊन संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीडमधील प्रकरणात दोन प्रकारची चौकशी करणार आहोत. एक म्हणजे आयजी लेवलचे अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केली आहे. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी सुद्धा केली जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी तीन ते सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल.
या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत आहे त्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. वाल्मिक कराडचा एका गुन्हात सहभाग दिसत आहे जर वाल्मिक कराडच्या संदर्भात दुसऱ्या गुन्हात सुद्धा पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणा-कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय जाहीर केला, आज उद्या याचे आदेश निघतील ही मात्र त्या नंतर येणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे एक चॅलेंज असणार आहे. हे चॅलेंज कोणताही प्रमोटेड अधिकारी स्वीकारू शकत नाही. बीडला फक्त राजकीय हस्तक्षेप चालू न देणारा आय पी एस, आय ए एस दर्जाचा पोलीस आधीकारी दिला तरचं तो चॅलेंज स्वीकारू शकेल अशी प्रतिक्रिया जनते मधून व्यक्त होत आहे
