डॉ. बाबासाहेब अंबेडकर अवमान प्रकरणी अंबाजोगाई शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने.
डॉ. बाबासाहेब अंबेडकर अवमान प्रकरणी अंबाजोगाई शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतने जोरदार निदर्शने
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री मा ना अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्या बद्दल अंबाजोगाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली.
शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नते आ.मा. सुनिलजी प्रभू साहब, उपनेते तथा मराठवाडा समन्वयक मा.विश्वनाथ नेरूरकर साहेब, उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे बीड जिल्हा संपर्क प्रमुख मा. परशुराम जाधव साहेब लोकसभा प्रमुख मा.आ. सुनिलजी धांडे सह संपर्क प्रमुख बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या उपस्थितीत शहर प्रमुख अशोक हेडे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे आज दि.21.12.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपजिल्हा अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री यांच्या निषेधार्थ निदर्शने करून अतिशहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली या वेळी महिला आघाडीच्या डॉ नैनाताई सिरसाठ, आशाताई जोगदंड जिल्हा सचिव दत्ता तादळे, ज्ञानेश्वर बोबडे, कॉ. बब्रूवान बाळासाहब वाघाळकर, सुधाकर काचने, शंकर मिसे. अर्जुन पोटभरे तर सुर्यकांत हावळे, बाबा भिसे, श्रवण सोनकांबळे शिवकांत कदम, सुंदर धोत्रे, दुल्हेखान पठाण, निलेश जाधव सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
