बारगळ साहेब, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आलेल्या बनावट दारू कारखान्यावर आज पर्यंत कार्यवाही का नाही ?
बारगळ साहेब, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बुट्टेनाथ नजीकच्या दरी मध्ये उघडकीस आलेल्या बनावट दारू कारखान्यावर आज पर्यंत ग्रामीण पोलीसांची कार्यवाही का नाही ?
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरा नजिक असलेल्या बुट्टेनाथ नजीकच्या दरी मध्ये मागील काही काळा पासून बनावट दारूचा कारखाना सुरू असताना या कारखान्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत कार्यवाही का केली नाही ? हा सवाल येथील नागरिक बीड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांना करत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाई शहरा नजीक ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बुट्टेनाथ दरी मध्ये असलेल्या बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यावर धाड टाकून आतील यंत्रसामग्री सह 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्या मुळे या पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आणि प्रश्न उपस्थित झाला तो आज पर्यंत या कारखान्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही का केली नाही.

बुट्टेनाथ हा परिसर येथील डोंगर दऱ्यात असून या परिसरात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या कृपेने असंख्य घावटी दारू बनवण्याच्या भट्ट्या सुरू आहेत ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मात्र या परिसरात चक्क बनावट दारू बनवण्याच्या कारखाणा उघडकीस येतो यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची धाड पडते यात या पथका कडून 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला जातो आणि सुरू असलेल्या या कारखान्याची खबर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना नसावी ही गोष्ट शक्यच नाही.
अंबाजोगाई ग्रामिण पोलीसांच्या कृपेने बुट्टेनाथ परिसरा सह राडी तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनवण्याच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यावर थातूर मातूर कार्यवाही करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी आज पर्यंत या बनावट दारूच्या कारखान्यावर कार्यवाही का केली नाही?

विशेष म्हणजे या परिसरात येथील अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आणि त्यांचे सोबत काही कर्मचारी मॉर्निग वॉकला जात असताना त्यांनाही या गोरख धंद्याची खबर कशी लागली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सर्व प्रकारा वरून हा कारखाना चालवणाऱ्या मंडळीने ग्रामीण पोलीस व अधिकारी यांचे हात ओले केले आहेत की बांधले आहेत हे काही समजायला तयार नाही त्यामुळे बीड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ हे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही करणार हे आता पहावे लागणार आहे.
